KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी परीक्षेच्या तारखा निश्चित, अभ्यासक्रम जाणून घ्या सविस्तर!

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची संधी आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या भरतीसंदर्भातील ऑनलाइन परीक्षेच्या तारखा सुद्धा आता जाहीर करण्यात आल्या आहेत. ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. लक्षात घ्या की ज्यांनी १० जून ते १५ जुलै २०२५ या दरम्यान अर्ज सादर केले आहेत, त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. परीक्षा वेळापत्रक आणि प्रवेशपत्र लवकरच महापालिकेच्या (Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti) अधिकृत संकेतस्थळावर (www.kdmc.gov.in) उपलब्ध होतील. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ (KDMC recruitment official website) तपासत राहणे आवश्यक आहे.

ही परीक्षा सरळसेवा भरती २०२५ च्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख १५ जुलै होती. आता भरतीच्या या पुढील टप्प्यात उमेदवारांच्या परीक्षेच्या तयारीची खरी कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या जाहिरातीत गट ‘क’ आणि ‘ड’ मधील विविध सेवांसाठी एकूण ४९० पदांची भरती होणार आहे. यामध्ये प्रशासकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, लेखा सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा तसेच निमवैद्यकीय सेवा या सर्वांचा समावेश आहे.

परीक्षेचा साधारण अभ्यासक्रम

सर्व पदांसाठी समान अभ्यासक्रम (KDMC Bharti 2025 syllabus in Marathi) ठेवण्यात आला असून यात चार मुख्य घटकांचा समावेश आहे,

  • मराठी भाषा
  • इंग्रजी भाषा
  • सामान्य ज्ञान
  • बुद्धिमत्ता चाचणी

या अभ्यासक्रमातून उमेदवारांची भाषिक कौशल्ये, तर्कशक्ती, सर्वसाधारण घडामोडींचे ज्ञान आणि विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाणार आहे.

पदनिहाय अभ्यासक्रम व सेवा

महानगरपालिका भरतीमध्ये अनेक विविध पदांचा समावेश केला आहे. प्रत्येक पदासाठीच्या अभ्यासक्रमात त्या विशिष्ट पदाशी निगडित विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रमुख पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे,

  • वैद्यकीय व आरोग्यविषयक पदे: फिजिओथेरपिस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन, मानसोपचार समुपदेशक.
  • लेखा व प्रशासकीय पदे: लेखापाल/वरिष्ठ लेखा परीक्षक, लेखा लिपिक, लिपिक टंकलेखक.
  • अभियांत्रिकी पदे: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी).
  • तांत्रिक व इतर पदे: प्रयोगशाळा तंत्रज्ञ, चालक-यंत्रचालक, अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, आया.

या सर्व पदांसाठी वेगवेगळे विषय व प्रात्यक्षिक ज्ञान तपासले जाणार आहे. उदाहरणार्थ, अभियांत्रिकी पदांसाठी स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत विषयांवरील काही प्रश्न विचारले जातील. आरोग्यविषयक पदांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील विषयांचा समावेश असेल, तर अग्निशमन सेवेसाठी शारीरिक क्षमता तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी तपासली जाईल.

परीक्षा वेळापत्रक व प्रवेशपत्र

या भरती परीक्षांचे वेळापत्रक आणि केंद्रांची माहिती लवकरच केडीएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या माहितीने लॉगिन करणे आवश्यक आहे. हॉल तिकीट (KDMC Hall Ticket 2025) परीक्षा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध होणार असून, ते परीक्षा केंद्रात घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे.

अभ्यासक्रमाची पीडीएफ

महानगरपालिकेने सर्व पदनिहाय अभ्यासक्रमाची पीडीएफ उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी ही पीडीएफ अवश्य डाउनलोड करून अभ्यासाची तयारी करून ठेवावी. पीडीएफ फाईल KDMC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा.
  • वेळापत्रक, परीक्षा केंद्र व हॉल तिकीट या सर्व गोष्टी केवळ ऑनलाइनच समजतील.
  • अभ्यास करताना सामान्य ज्ञानासाठी चालू घडामोडी, मराठी व इंग्रजी व्याकरण, तसेच मानसिक चाचणीसाठी तर्कशास्त्र व विश्लेषण यांचा सखोल सराव करावा.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२५ (KDMC Recruitment 2025) ही अनेक तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. प्रशासकीय, आरोग्य, अभियांत्रिकी, अग्निशमन, विधी, क्रीडा, उद्यान अशा विविध सेवांमध्ये नोकरी मिळवण्याची ही संधी कोणत्याही उमेदवाराने गमावू (KDMC recruitment latest news update) नये.