Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आता योजना थांबणार नाही… फडणवीसांची ऐतिहासिक घोषणा!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ज्या गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे अशा महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना म्हणजे त्यांच्या जीवनातली एक महत्त्वाची आशा ठरली असल्याचं बोललं तर चुकीचं ठरणार नाही. दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा होणारे 1500 रुपये ही रक्कम त्यांच्यासाठी फक्त आर्थिक मदत नाही, तर त्यांच्या घराच्या गरजा भागवण्यासाठीचा एक छोटा पण अत्यंत महत्त्वाचा आधार ठरत आहे. रोजच्या संसारातले काही खर्च भागवण्यासाठी अनेक महिला या योजनेवर अवलंबून झाल्या आहेत, आणि म्हणूनच ही योजना महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली असल्याचं बघायला मिळत आहे.

या योजनेत सुरूवातीपासून काही स्पष्ट अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी पात्र (Ladki Bahin Yojana Eligibility) नसलेल्या महिलाही या योजनेत समाविष्ट झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सरकारने या योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली. सुरुवातीला e-KYC साठी 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिली होती, पण महिलावर्ग मोठा असल्याने अनेक महिला या प्रक्रियेत मागे पडल्यामुळे सरकारने आता मोठा दिलासा देत अंतिम मुदत वाढवली आहे. आता प्रत्येक पात्र महिलेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC (Ladki Bahin Yojana KYC Last Date) पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना वेळेअभावी किंवा कागदपत्रांच्या कारणामुळे अडचण येत होती, त्यांना पुन्हा एकदा e-kyc करण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांत विरोधकांकडून असा आरोप केला जात होता की लाडकी बहीण योजना आगामी काळात बंद केली जाईल. या आरोपांमुळे अनेक महिलांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली होती. पण वाशिममधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सर्व अफवांवर मोठा पडदा टाकत थेट स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी जाहीर केलं की, जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं दिसून येत आहे.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी (Devendra Fadnavis Announcement) आणखी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आणि ती म्हणजे अशी की ही योजना फक्त लाडक्या बहिणी निर्माण करणारी नाही, तर त्यांना लखपती दीदी (Lakpati Didi Scheme Maharashtra) बनवणारी योजना आहे. त्यांनी सांगितलं की सरकारने आतापर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि पुढील काळात आणखी 50 लाख महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याचा मोठा संकल्प सरकारकडून करण्यात आला आहे.

लखपती दीदी ही संकल्पना म्हणजे महिलांना केवळ महिन्याला 1500 रुपये देणे नसून, तर त्यांना स्वयंरोजगार, व्यवसाय, बचत गट, आणि आर्थिक कौशल्ये विकसित करून दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न असणार आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी किंवा छोट्या-मोठ्या उपक्रमांसाठी आवश्यक मार्गदर्शन, कर्जसुविधा, प्रशिक्षण आणि आर्थिक शिस्तीची शिकवण देऊन त्यांना सक्षम बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.

या सर्व घोषणांमुळे महिलांचा लाडकी बहीण योजनेबद्दलचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. योजना बंद होणार अशा अफवा दूर झाल्या असल्याने महिलांनी पुन्हा एकदा सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

आजच्या घडीला लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपूर्वीची घोषणा (Ladki Bahin Yojana Latest Update) नसून, लाखो महिलांच्या आयुष्याला दिशा देणारी आणि त्यांच्या हक्कांना बळ देणारी योजना ठरली आहे. आणि नव्या अपडेटनंतर या योजनेकडून महिलांच्या अपेक्षा अजूनच वाढल्या आहेत.