Ladki Bahin Yojana Documents Required: लाडक्या बहिणींना नव्या नियमांचा मोठा दिलासा! पती किंवा वडील हयात नसल्यास आता फक्त ही कागदपत्रे पुरेशी

Ladki Bahin Yojana Documents Required: तर मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय अखेर घेण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधारकार्ड देणे आवश्यक ठरल्यामुळे अनेक महिलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषत: पती किंवा वडील हयात नसलेल्या, घटस्फोटित किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी ही प्रक्रिया जवळपास अशक्यच बनली होती. पण आता शासनाने त्या बहिणींच्या समस्या समजून घेतल्या असल्याचं दिसत आहे. कारण सरकारने नवीन नियमांत स्पष्ट स्वरूपात सवलत देत मृत्यू प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे अधिकृत आदेश स्वीकारण्याचा निर्णय (Maharashtra Ladki Bahin Scheme News) घेतला आहे, ज्यामुळे हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं बघायला मिळत आहे.

राज्य शासनाने सुरू केलेली “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना ही आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे केले आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर ही निश्चित करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेत पती किंवा वडिलांचे आधारकार्ड आवश्यक असल्याचे पाहून अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. कारण लाखो महिलांचे पती किंवा वडील आता हयात नाहीत, काहींचे घटस्फोट झाले आहेत, तर काहींजवळ यासंबंधीत कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत. आणि या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने जवळपास 92 हजारांहून अधिक महिलांची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2025) तपासणी अजूनही प्रलंबित राहिली होती.

शासनाच्या नवीन निर्णयानुसार, अशा सर्व महिलांना आता फक्त मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश जमा करणे पुरेसे ठरणार आहे. यासाठी महिलांनी संबंधित कागदपत्रांची खरी ओरिजिनल कॉपी अंगणवाडी सेविकांकडे जमा केल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात येईल आणि त्या महिलांना पती/वडिलांच्या ई-केवायसीपासून सूट मिळेल. हा निर्णय केवळ एक सोपी प्रक्रिया नाही, तर अनेक महिलांसाठी सन्मानाने आणि अडथळ्यांशिवाय हक्काचा लाभ मिळवण्याचा एक उत्तम मार्ग ठरला आहे.

राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 10 लाख 4 हजार लाभार्थी महिला लाभ घेत आहेत. यातील बहुसंख्य महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिलेली होती. मात्र नवीन नियमांतील सवलतीनंतर त्या महिलांसाठी या योजेचा लाभ घेण्यात सहजता निर्माण झाली असल्याचं दिसत आहे. या योजनेमागील सरकारचा उद्देश स्पष्ट आहे आणि तो म्हणजे अपात्रांना वगळणे, पात्र महिलांपर्यंत नियमानुसार लाभ पोचवणे आणि प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवणे.

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, मात्र पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी घेण्यात आलेला हा निर्णय अनेक महिलांसाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण अनेकदा कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने महिलांना सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागले होते. मात्र सरकार द्वारे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे हजारो महिलांच्या मनात दिलासा निर्माण झाला आहे.

ई-केवायसी (e-KYC for Ladki Bahin Scheme) करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (जर पती/वडील हयात नसतील):

  • पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  • जर लागू असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असेल.
  • काही विशेष प्रकरणांत न्यायालयाचा आदेश देखील महत्वाचा ठरू शकतो.

प्रक्रिया कशी करावी?

महिलांनी स्वतःची ई-केवायसी (Ladki Bahin Yojana e-KYC Process) पूर्ण करून वरील कागदपत्रांची ओरिजिनल कॉपी अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबरपूर्वी जमा करावी. सेविका तपासणी करून संबंधित लाभार्थी पती/वडीलांच्या ई-केवायसीपासून (eKYC Last Date Maharashtra) मुक्त होण्यास पात्र आहेत की नाही, याबद्दल तपासणी आणि एकदा खात्री झाल्यावर पात्र महिलांना योजनेंतर्गत लाभ मिळत राहील.