Ladki Bahin Yojana Income Verification: लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या महिलांसाठी संकट, आयकर विभागाकडून सखोल तपासणी

Ladki Bahin Yojana Income Verification: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आधारस्तंभ ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता एका मोठ्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचली असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीपासूनच या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे, कधी मुलांच्या शिक्षणासाठी, कधी घरातील तातडीच्या खर्चासाठी, तर कधी आजारपणासाठी ही रक्कम मदतगार साबित झाली होती. पण आता सरकारच्या नव्या आदेशामुळे अनेक महिलांच्या मनात भीती, चिंताही वाढू लागली आहे. कारण सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलण्याचा निर्णय (Ladki Bahin Yojana strict rules) घेतला आहे आणि या नव्या नियमांमुळे हजारो महिलांचे लाभ तात्काळ बंद होऊ शकतात.

सरकारने सगळ्यात आधी तर ई-KYC करणं बंधनकारक केले आहे आणि हे ई-KYC आता केवळ आधार लिंकिंगपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. या प्रक्रियेत लाभार्थी महिलेची वैयक्तिक माहिती, तिच्या पती किंवा वडिलांचे उत्पन्न, त्यांचे PAN, बँक खाते, कर विवरणपत्रे, मागील आर्थिक व्यवहार, सर्व काही तपासले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण डेटा थेट आयकर विभागाकडे पाठवला जाणार असल्याने, कोणत्या लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न किती आहे, तिने दिलेल्या माहितीमध्ये काही चूक आहे का, तिने पात्रतेपेक्षा कमी जास्त उत्पन्न दाखवले आहे का, हे सगळं स्पष्ट होणार आहे.

यामागे सरकारचं धोरण स्पष्ट आहे की या योजनेचा फायदा केवळ खऱ्या अर्थाने गरजू, आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांपर्यंतच पोहोचायला हवा. त्यामुळे जर कोणत्याही महिलेचे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख (Ladki Bahin Yojana eligibility rules) रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळले तर तिचे हप्ते त्वरित बंद होतील आणि ती कायमची अपात्र घोषित केली जाईल.

आतापर्यंत 2.5 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेत नाव नोंदवले होते, पण त्यातील तब्बल 52 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. हा आकडा इतका मोठा आहे की सरकारला ही योजना (Maharashtra Ladki Bahin Yojana 2025) अजून कडकपणे तपासावीच लागली. कारण अजूनही काही महिलांनी चुकीची माहिती दिली किंवा खोटे कागद दाखवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक महिलांच्या मनात आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, जर पात्र नसताना लाभ घेतला असेल तर पुढे काय होणार? सरकारकडे दोन पर्याय आहेत, लाभ सरळ बंद करणे आणि त्यांना मिळालेली रक्कम मागे घेणे. ज्या केसेसमध्ये मोठी फसवणूक किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिल्याचे पुरावे मिळतील, तिथे भरलेले सर्व हप्ते परत मागवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

आता लाभार्थींनी e-KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. 31 डिसेंबर 2025 नंतरही ज्या महिला (Ladki Bahin Yojana e-KYC deadline) e-KYC पडताळणी करणार नाही त्यांचे हप्ते सरळ बंद केले जातील आणि मागील हप्त्यांवरही परिणाम होऊ शकतो. या प्रक्रियेत आधार पडताळणी, बँक खाते तपासणी, PAN तपासणी, उत्पन्न प्रमाणपत्र, कुटुंब सदस्यांचे उत्पन्न, सगळं एकत्र तपासलं जाणार आहे. यामुळे पात्र आणि अपात्र यातील सीमारेषा अगदी स्पष्ट होईल. ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला असला तरी नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकर जमा होण्याची शक्यता आहे. पण पुढील प्रत्येक हप्ता तुमची ई-KYC पूर्ण आहे की नाही, आणि आयकर तपासणीत काही चूक तर आढळत नाही ना, यावर अवलंबून असेल.

लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने गरजू आणि दैनंदिन संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी आहे. त्यामुळे जे या योजनेवर खऱ्या अर्थाने अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी ही तपासणी अडथळा ठरणार नाही. पण ज्या महिलांनी खोटं उत्पन्न दाखवलं, चुकीची माहिती दिली किंवा फसवणूक करून लाभ घेतला, त्यांच्यासाठी ही तपासणी अत्यंत कठीण ठरणार आहे.

एकूणच, सरकारने घेतलेला हा निर्णय (Ladki Bahin Yojana Latest Update) नक्कीच सर्वात मोठा आणि कठोर टप्पा आहे. आता पात्र महिला निश्चिंत राहू शकतात, पण ज्या अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची बोगस पात्रता आता कायमची संपणार आहे.