Ladki Bahin Yojana: तुम्हाला ‘मुख्यमंत्री माझी, लाडकी बहिन योजने’चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला 30 ऑगस्ट आधी तुमचा अर्ज सादर करावा लागेल. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकांकडे अर्ज करण्याचे आवाहन करून जिल्हा परिषद प्रशासनानेही योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत जनजागृती सुरू केल्याचे सांगितले.
महिलांचे आर्थिक स्वावलंबन, स्वातंत्र्य आणि सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने राज्यात 1 जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना राज्य सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातील.Ladki Bahin Yojana
यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे प्रती वर्षाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांच्या आत असावे. संबंधित महिलेने महाराष्ट्रातील रहिवासी असावे. ही योजना राबविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.
31 ऑगस्ट 2024 पर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेसाठी अर्ज करता येतील. या योजनेद्वारे पात्र महिलांना सरकार तर्फे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
राज्य सरकारच्या ‘नारी शक्ती दूत’ मोबाइल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येतील.
तथापि, ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाहीत त्या महिला अंगणवाडी केंद्राला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
ऑनलाइन अर्ज कसा करावा? How to apply online for Ladki Bahin Yojana
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम गुगल प्ले-स्टोअरवरून राज्य सरकारने तयार केलेले नारीशक्ती दूत नावाचे ॲप डाउनलोड आणि स्थापित करावे लागेल.
पुढे, तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि खाली दिलेल्या अटी व शर्तींना सहमती द्यावी लागेल. त्यानंतर साइन इन पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते एंटर करा आणि Verify OTP वर क्लिक करा. मग तुमचे प्रोफाइल पूर्ण करा.
येथे तुम्हाला अर्जदाराचे पूर्ण नाव आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका आणि महिला शक्तीचा प्रकार ( बचत गटाच्या अध्यक्ष/सचिव/ सदस्य, गृहिणी, सामान्य महिला, ग्रामसेवक) यापैकी निवडायचे आहे. त्यानंतर Update या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज समोर येईल. येथे तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या नारी शक्ती दूत पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर योजनेचा अर्ज उघडेल.
सर्वप्रथम तुम्हाला महिला अर्जदाराचे पूर्ण नाव, पती किंवा तिच्या वडिलांचे नाव आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
यानंतर तुम्हाला अर्जदाराच जन्म ठिकाण, पत्ता, गाव किंवा शहर, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नाव आणि पिन कोड टाकावा लागेल. यानंतर संपूर्ण पत्ता, तसेच मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.
इतर सरकारी विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ मिळतो का या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही असेच द्यावे लागेल. जर होय, तर तेथे लाभाची रक्कम नमूद करावी लागेल.
यानंतर लाभार्थीची वैवाहिक स्थिती निवडावी लागेल. अर्जदाराने विवाहित, अविवाहित, परित्यक्ता, निराधार, विधवा, घटस्फोटित इत्यादींपैकी योग्य पर्याय निवडावा.
पुढे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. तुम्हाला या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव, खातेदाराचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकावा लागेल.
तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला गेला आहे का असा प्रश्न असेल. याचे उत्तर होय किंवा नाही यापैकी निवडा.
आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नसेल तर तो लिंक करणे आवश्यक आहे.
यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
Accept Guarantee या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या स्वीकारा पर्यायावर क्लिक करा आणि नंतर Save Information या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती दाखवण्यात येईल, तुम्हाला ती माहिती वाचावी लागेल आणि सबमिट फॉर्म या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्या नंबर किंवा मोबाईल फोनवर एक OTP पाठवला जाईल, तो एंटर करा आणि तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल.
यानंतर तुमचा अर्ज आणि त्याची स्थिती मुख्य पृष्ठावर दिसेल. तेथे सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्ज क्रमांक दिला जाईल. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ते वापरू शकता. यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.