Land Ceiling Act Amendment 2022: तुकडेबंदी कायद्यात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना होईल हा फायदा!

Land Ceiling Act Amendment2022ग्रामिण भागातील एक ते दोन गुंठा शेतजमीन खरेदी विक्री करण्यास शासनाने बंदी आणली होती. त्याचे कारण असे की, शेतजमीनीचे तुकडे झाल्यास उत्पादन क्षमता कमी होते. म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार कोणीही छोट्या छोट्या जागा खरेदी किंवा विक्री करु शकणार नाही. त्या खरेदी विक्री केल्या गेल्या तर त्यावर दस्त नोंदणी होऊ शकणार नाही. कारण  हे बेकायदेशीर आहे. परंतू शेतकऱ्यांच्या अनेक गरजा लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. त्या नक्की कोणकोणत्या सुधारणा आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. Tukdebandi kayada sudharana

तुकडेबंदी कायदा करण्यासंदर्भात शासनाची भूमिका

दिनांक  12 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार, 1,2,3 अशी गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्यास महाराष्ट्र  राज्य सरकारने  निर्बंध लावला होता.  या परिपत्रकाला विरोधही झाला होता. हे प्रकरण न्यायालयतही गेले त्यानंतर 5 मे 2022 राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे, तर बागायत जमिनीसाठी 10 गुंठे एवढे तुकड्याचे प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आले आहे. Land Ceiling Act Amendment2022

तुकडेबंदी कयद्यात सुधारणा  

तुकडेबंदी कायद्यात सुधारणा Section 37 मध्ये करण्यात आली आहे. 1951 मध्ये पारित झालेल्या तुकडेबंदी कायद्यात विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. 2019 मध्ये या कायद्यात महत्त्वाची सुधारणा केली गेली होती. शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि त्यांच्या मागणीनुसार तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. Land Ceiling Act Amendment2022

तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेमुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा

तुकडेबंदी कायद्यामधील सुधरणांमुळे शेतकऱ्यांना विविध फायदे होत आहेत. ते नक्की कोणकोणते ते आपण पुढील प्रमाणे समजून घेऊ. Land Ceiling Act Amendment2022

कमी प्रमाणात शेती खरेदीविक्री करणे शक्य

एखाद्या शेतकऱ्याची आर्थिक कुवत कमी जमीन खरेदी करण्याची असेल तर  या तुकडे बंदी कायद्यामधील सुधारणेमुळे  शेतकरी त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार जमीन खरेदी करु शकणार आगे.

विहिरीसाठी जमीन मिळवणे शक्य

एखाद्या व्यक्तीस एक गुंठा किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करुन आपल्या शेतजमीनीच्या बाजूलाच विहिर खणायची असल्यास ती व्यक्ती या कायद्यामुळे हे काम करु शकत आहे. विहिरीसाठी जास्त जमिनीची आवश्यकता नसते. सुधारीत तुकडेबंदी कायद्यामुळे कमी प्रमाणात जमीन खरेदी करणे शक्य झाले आहे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचेच होत आहे. Land Ceiling Act Amendment2022

शेतरस्तायसाठी जमीन मिळवणे शक्य

एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जाण्यासाठी किंवा घराकडे जाण्यासाठी मधून जाणारा रस्त्याची जमीन ही दुसऱ्याच व्यक्तीची असेल तर अडचण निर्माण होऊ शकते. अशावेळी शेतरस्त्याची जमीन किंवा घराकडे जाणारी रस्त्यापुरती जमीन खरेदी केली जाते. तुकडेबंदी कायद्यामुळे या अशापद्धतीच्या गोष्टी सहज शक्य नव्हत्या. परंतु आता तसे नाही एखाद्या व्यक्तीला रस्त्यापुरती थोडी जमीन खरेदी करुन त्याची दस्त नोंदणी आपल्या नावावर करणे शक्य आहे. Land Ceiling Act Amendment2022

जमिनीच्या खरेदी विक्रीला चालना

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या खरेदी विक्रीला चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणातील जमीन विकून आर्थिक गरज भागवण्याची सोय निर्माण झाली आहे. याचा फायदा अनेक शेतकरी करताना देखील दिसून येतात. तुकडा बंदी कायद्यामुळे 1 ते 2 गुंठा जमीन शेतकरी विकू शकत नव्हते. परंतू आता ही बाबा सोपी झाली आहे. शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होत आहे. Land Ceiling Act Amendment2022

अशापद्धतीने महाराष्ट्र राज्य शासनाने तुकडेबंदी कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे शेतकऱ्यांना फायदा तर होत आहेच सोबतच उत्पादन वाढीसाठी देखील या कायदा दुरुस्तीचा फायदा होताना दिसून येत आहे. Land Ceiling Act Amendment2022