Land record 1880 पासूनचे जमिनीचे उतारे अशा प्रकारे बघा आपल्या मोबाईलवर

Land record 1880

Land record 1880: शेतकऱ्यांसाठी जमीनीचा तुकडा हा अत्यंत भावनिक विषय ठरतो, त्यामुळे बरेचदा शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवरुन वाद देखील होतात. परंतू याआधीच जर का जमीनीच्या सातबारामध्ये काही फेरफार झालेले असतील तर ते पाहण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत असत. परंतु आता हे सर्व सोपे झाले आहे. आता आपण 1880 पासूनचे जमीनीचे सर्व जुने सातबारा फेरफार अगदी आपल्या मोबाईलवर देखील पाहू शकणार आहेत. डिजीटल भारत या योजने अंतर्गत सर्व शासकीय कागदोपत्री कामे संगणकावर घेण्याचा भारतीय केंद्र शासनाचा निर्णय जिल्हा आणि तालुका पातळीवर देखील राबवला जात आहे. त्याचेच फलीत म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जमीनीच्या सातबारामध्ये झालेले फेरफार त्यांना घरबसल्या बघता येणार आहेत.  

1880 पासूनचे जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार पाण्यासाठी पुढील प्रक्रीया

Land record 2023 पाहण्यासाठी पुढील साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार पाहू शकता. 

  • aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जा.
  • पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
  • त्यात उजवीकडील “भाषा’ पर्यायावर क्लिक करून मराठी भाषेचा पर्याय निवडा.
  •  महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर लॉगीन आयडी आणि पासवर्ड आयडी टाकून तुमच्या नावाची नोंदणी म्हणजेज रजीस्ट्रेशन करा.  
  • रजीस्ट्रेशन करताना तुम्हाला पेजवर वैयक्तिक माहिती  भरावी लागेल उदा. नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर इत्यादी.
  • त्यानंतर तुमची इतर माहिती देखील तुम्ही त्यात भरा. तुम्ही व्यवसाय काय करता, मेल-आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाना भरा. आणि पुढे Captcha चौकटीत टाईप करा. व सबमिट बटण दाबा.
  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
  • तुमचा  गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते. त्यात  जमीनीच्या सातबारामध्ये फेरफार केल्याचे वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार पाहायचा असेल तो तुम्ही पाहू शकता.

जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी अत्यंत सोयीचे

      जमीनीच्या सातबाऱ्यात झालेले फेरफार शेतकऱ्यांना तर पहावे लागतातच आणि त्याचबरोबर ज्यांना जमीन खरेदी करायची आहे आणि जमीन विकायची आहे अशा नागरिकांना देखील महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईटवरील ही सेवा  अत्यंत उपयोगी पडत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे आणि जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांचे शासकीय कार्यालयांतील फेऱ्या वाचल्या. वेळ वाचला आणि मेहनत देखील.

भ्रष्टाचाराला आळा

      1880 पासूनचे Land record शासनाने जनसामान्यांना पाहण्यासाठी खुले केल्याने अनेक फायदे होतातना दिसत आहेत त्यातलाच एक फायदा म्हणजे जमीनीच्या सातबाऱ्यात झालेले फेरफार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देऊन शासनाने भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम केल्याचे दिसून येते. कारण अनेक शेतकरी सांगतात की, शासकीय कार्यालयांमध्ये जमीनीच्या फेरफेरासंबंधीची माहिती शेतकऱ्यांकडून मागण्यात आल्यास अधिकारी वर्ग बरेचदा या कामासाठी त्यांच्याकडे अतीरीक्त पैशांची मागणी करीत असे. जे शेकतरी पैसे देऊ शकत असत त्यांनाच जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार land record संबंधी कागदपत्र दिले जात असत आणि जे शेतकरी शासकीय अधिकाऱ्यांना पैसे देऊ शकत नसत त्यांना त्यांच्या जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार land record पाहता येत नसत.  ही अत्यंत खेदजनक गोष्ट होती. परंतु आता तसे नाही. कोणीही कधीही आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून 1880 पासूनचे land record म्हणजेच जमीनीच्या सातबाऱ्यासाबंधी केलेले फेरफार पाहू शकणार आहेत. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट आणि फॉलो करा आणि अशाच शेतीविषयक आणि शासकीय ऑलाईन सेवांविषयीच्या अधिक माहितीसाठी आमच्या ब्लॉगला भेट देत रहा.