Land Records Recruitment 2025: भूमिअभिलेख विभागात 905 भूकरमापकांची मोठी भरती जाहीर!

Land Records Recruitment 2025: राज्यातील शेकडो शेतकरी, नागरीक आणि बांधकामाशी संबंधित कामकाज हे भूमिअभिलेख विभागावर अवलंबून असतात. जमिनीचे मोजमाप, वादांचे निराकरण आणि नोंदींची अचूकता यासाठी या विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभागात भूकरमापकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होत असल्याचे बघायला मिळाले. मात्र आता याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत भूमिअभिलेख विभागात तब्बल 905 Surveyor पदांसाठी भरती (Maharashtra Surveyor Vacancy) करण्यात येणार असून, त्यासोबतच लघुलेखक पदांवरही ही भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

मागील भरती आणि रिक्त जागांची समस्या

दोन वर्षांपूर्वी शासनाने राज्यात सुमारे 1200 भूकरमापकांची नियुक्ती केली होती. परंतु विविध कारणांमुळे जवळपास 700 जणांनी या नोकरीचा राजीनामा दिला होता. याचा परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यांत भूकरमापकांच्या अनेक जागा रिक्त राहिल्या आणि मोठ्या प्रमाणात जमिनींच्या मोजण्या प्रलंबित झाल्या. यामुळे शेतकऱ्यांना, बांधकाम व्यावसायिकांना आणि सामान्य नागरिकांना एक ना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

शासनाची मान्यता आणि नवीन भरती

मात्र आता ही आणि अश्याच अनेक समस्या लक्षात घेऊन भूमिअभिलेख (Bhumi Abhilekh Bharti 2025) विभागाने राज्य शासनाकडे यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. आणि आता अखेर शासनाने या प्रस्तावाला पूर्णपणे मान्यता दिली आहे. नव्या निर्णयानुसार, 905 भूकरमापक पदांसह Stenographer (High Grade) आणि Stenographer (Low Grade) पदांवरही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागातील कामकाज अधिक वेगवान होणार असून, नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास सुद्धा मदत होणार आहे.

महसूल विभागनिहाय भूकरमापक पदांची संख्या

  • मुंबई विभाग: 259 पदे
  • नाशिक विभाग: 124 पदे
  • छत्रपती संभाजीनगर विभाग: 210 पदे
  • अमरावती विभाग: 117 पदे
  • नागपूर विभाग: 112 पदे
  • एकूण पदसंख्या: 905 पदे

लघुलेखक पदांची भरती

भूकरमापक पदांसोबतच:

  • लघुलेखक (उच्चश्रेणी): 2 पदे
  • लघुलेखक (निम्न श्रेणी): 9 पदे

का महत्त्वाची आहे ही भरती?

ही भरती केवळ रोजगाराची संधी म्हणून नाही, तर भूमिअभिलेख विभागातील (Land Records Department Jobs) ताण कमी करण्यासाठीही अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मोजणीची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी या भरतीतून मिळणाऱ्या मनुष्यबळाचा मोठा फायदा होईल. शिवाय, ग्रामीण भागात जमिनीशी संबंधित वाद लवकर सोडवणे, शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदी वेळेत उपलब्ध करून देणे आणि विकासकामांना गती देणे सोपे होणार आहे.

भूकरमापक पदांसाठी अपेक्षित पात्रता व वेतनमान

  • भूकरमापक पदासाठी मागील भरतींमध्ये अशी पात्रता पाहिली गेलीय की उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण असावं आणि Surveyor ट्रेडमध्ये ITI किंवा Civil Engineering मध्ये Diploma असण्याची अट असते.
  • उमेदवारांसाठी वयोगट हा साधारणपणे 18 ते 37 वर्षांदरम्यान असतो, आरक्षित प्रवर्गांना वेगवेगळी सूट दिली जाते.
  • वेतनमान हे स्थानानुसार बदलते, काही अहवालानुसार Surveyor पदांसाठी मासिक वेतन स्तर ₹19,900 ते ₹63,200 पर्यंत असू शकते.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?

शासनाने भरतीस मान्यता दिल्यानंतर आता लवकरच या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना देखील प्रसिद्ध केली जाईल. पात्रता निकष, शैक्षणिक अट, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती (Land Records Recruitment Notification 2025) तुम्हाला अधिकृत अधिसूचनेतूनच समजू शकेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ही भरती शेकडो युवकांना सरकारी (Maharashtra Government Jobs 2025) नोकरीची सुवर्णसंधी देणार असून, त्या सोबतच राज्यातील महसूल विभागाचे काम अधिक कार्यक्षम करण्यासही मदत करणार आहे.