Magel Tyala Solar Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Solar Pump Yojana) विशेषतः त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्रोत आहे, पण पारंपारिकरित्या विजेची सोय त्यांच्याजवळ नाही. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत ऊर्जा वापरून सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी, सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना सौर पंपाच्या किंमतीच्या १०% रक्कम भरावी लागते, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ही रक्कम केवळ ५% आहे. चला तर मग, आजच्या या लेखात या योजनेसाठी अर्ज आणि पेमेंट कसा करायचा या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊया.
सोलर पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा? | Magel Tyala Solar Pump Yojana Online Application
सध्या सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करणे काही शेतकऱ्यांना जमणे कठीण होते. पण काळजी करू नका, आता तुम्ही मोबाईलद्वारेही हा अर्ज सहजपणे सादर करू शकणार आहात. अगदी तुम्ही कामात असाल, शेतात काम करत असाल तरी सुधा, तुम्ही तुमचं काम करता करता तुमच्या मोबाईलवरूनच हा अर्ज भरू शकणार आहात, ज्यामुळे तुमच्या शेतीच्या कामातही कोणता व्यत्यय येणार नाही आणि तुमचा फॉर्म सुद्धा भरून होईल. मात्र यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार असण्याची आवश्यकता असणार आहे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सातबारा उतारा (विहीर किंवा बोअर अर्जदाराच्या नावे असावी)
- संमती पत्र (सामाईक विहीर असल्यास इतर भागधारकांची संमती आवश्यक)
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी डिजिटल सातबारा काढावा लागतो.
ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट कसे करावे? | How to Apply and Make Payment for Solar Pump
- Mahadiscom संकेतस्थळावर जा – सर्वप्रथम तुम्हाला mahadiscom या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. तिथे लाभार्थी सुविधा (Beneficiary Services) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- लाभार्थी क्रमांक (Beneficiary ID) टाका – अर्ज भरताना तुम्हाला लाभार्थी क्रमांक (MKID) मिळाला असेल. तो तिथे टाका.
- माहिती तपासा – अर्जदाराचे नाव, जिल्हा, आधार क्रमांक, अर्जाची तारीख ही सर्व माहिती योग्य भरली असल्याची खात्री करून घ्या.
- पेमेंट करा – सर्व अटी वाचून घेतल्यानंतर ‘रक्कम भरणा करा’ पर्यायावर क्लिक करा. पेमेंटसाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, यूपीआय अशा विविध पर्यायांचा वापर करता येईल.
- पावती सुरक्षित ठेवा – पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनवर पेमेंटची पावती दिसेल, ती सेव्ह करून ठेवा.
सौर पंपासाठी HP कसा निवडावा? | Solar Pump HP Selection for Farmers
योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ३ एचपी, ५ एचपी, आणि ७ एचपी सौर पंपाचे पर्याय आहेत. त्यामध्ये ३ एचपीसाठी २२,९७१ रुपये, ५ एचपीसाठी ३२,०७५ रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे, डेबिट कार्ड किंवा यूपीआयद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही, मात्र क्रेडिट कार्ड वापरल्यास थोडेसे चार्जेस लागू शकतात.
महत्वाचे मुद्दे | Important Points for Farmers
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांनी डिजिटल सातबारा आणि वरील कागदपत्रे आधीपासून तयार ठेवावीत. अर्ज केल्यावर मिळालेल्या लाभार्थी क्रमांकाची नोंद करा आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केल्यावर मिळालेली पावती सेव्ह करून ठेवा.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सौर पंपाची सुविधा देण्यात येत आहे. ही योजना तुमच्या शेतीला आवश्यक असलेली पाणीपुरवठ्याची गरज पूर्ण करेल, आणि त्या बरोबरच वीज बिल खर्चात बचत होईल.