MAHA REAT Bharti 2024: महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरणाने (महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिल न्यायाधिकरण) आपल्या विभागातील विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक, वाहन चालक अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार असून, सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आता तुमच्या हातात आली आहे. 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा अवश्य घ्यायला हवा.
भरती विभाग | MAHA REAT Bharti 2024 Recruitment department
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरणात ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली संधी आहे. या भरतीत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज स्वीकृत करण्यात येत आहेत.
भरती प्रकार | Recruitment Type
ही भरती सरकारी विभागांतर्गत असल्यामुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. सरकारी विभागात नोकरी ही एक उत्तम संधी तर आहेच पण सोबतच स्थिरता, आणि उत्तम वेतन सुद्धा या नोकरीत उपलब्ध असल्याने उमेदवारांनी यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
पदांचे नाव आणि मासिक वेतन | Post’s name and salary
- शिपाई – 27,000/- रुपये मासिक वेतन
- वाहन चालक – 28,000/- रुपये मासिक वेतन
- कनिष्ठ लिपीक – 36,000/- रुपये मासिक वेतन
- अभिलेखापाल – 45,000/- रुपये मासिक वेतन
- लघुटंकलेखक – 47,030/- रुपये मासिक वेतन
- तांत्रिक सहायक – 48,000/- रुपये मासिक वेतन
- माहिती तंत्रज्ञान अधिकारी (I.T. Officer) – 50,000/- रुपये मासिक वेतन
- सहायक अधिक्षक – 50,000/- रुपये मासिक वेतन
- अधिक्षक – 55,000/- रुपये मासिक वेतन
- वित्त व लेखाधिकारी – 78,000/- रुपये मासिक वेतन
- निम्म श्रेणी लघुलेखक – 65,000/- रुपये मासिक वेतन
- स्वीय सहायक – 90,000/- रुपये मासिक वेतन
- खाजगी सचिव – 1,10,000/- रुपये मासिक वेतन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | MAHA REAT Bharti 2024 Eligibility Criteria
- खाजगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक: पदवीधर, टायपिंग कौशल्य आणि MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- वित्त आणि लेखाधिकारी: पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक: पदवीधर असणे आवश्यक आहे.
- माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक सहाय्यक: संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विज्ञान पदवी आवश्यक आहे.
- स्टेनोग्राफर, रेकॉर्ड कीपर, कनिष्ठ लिपीक: पदवीधर आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ड्रायव्हर, शिपाई: 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रिया आणि अर्ज पद्धती | Recruitment Process
अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत कुरीअर, पोस्ट किंवा वैयक्तिकरित्या पाठवणे आवश्यक असणार आहे. अर्ज पाठवताना त्यावर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहात हे ठळकपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर येणारे अर्ज कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता | MAHA REAT Bharti 2024
प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई 400001.
निवड प्रक्रिया | Selection Process
निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती 11 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. त्या कालावधीनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता पाहून पुढील 11-11 महिन्यांची पुनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येणार आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख | Last date to apply
23 ऑक्टोबर 2024 ही अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे.
वरील माहितीवर आधारित तुमच्यासाठी स्थिरता प्रदान करणारी ही नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरणात मोठ्या प्रमाणावर जागा भरल्या जात आहेत. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
PDF जाहिरात आणि अर्ज डाउनलोड:
PDF जाहिरात
https://drive.google.com/file/d/1SL8gEUmEjToZTLHr8WeiPBkMpek6m8WS/view
अर्ज
https://drive.google.com/file/d/1SMJrf3YBSBsCj7j1l0kXi9qpfjdwpNFI/view