Maharashtra Gramin Bank Loan : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक देत आहे सर्व प्रकारचे लोन! 5 मिनिटांत करा ऑनलाईन अर्ज

Maharashtra Gramin Bank Loan

Maharashtra Gramin Bank Loan : पैशाची गरज आज प्रत्येकाला आहे. कोणाला गाडी घेण्यासाठी, तर काहींना घर घेण्यासाठी किंवा इतर कामांसाठी लाखों रुपयांची गरज असते. जेव्हाही तुम्ही असं काही करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करता, तुम्ही नेहमी कमी व्याजदराने कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करता. कर्जाचे व्याजदर हे नेहमी बदलत असतात. 

सध्याच्या काळात कर्ज मिळवणं देखील काही सोपं नाही. यासाठी कितीही अर्ज केले तर लवकर कर्ज मिळत नाही. परंतु, तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बॅंक तुम्हाला सहजपणे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. विविध कामांसाठी तुम्हाला ही बॅंक कर्ज देणार आहे.

Personal Loan ग्रामीण बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ग्रामीण बॅंक ग्राहकांना सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा पुरवते, जेणेकरून तुम्ही गरजेनुसार तुम्ही बॅंकेकडून कर्ज घेऊ शकता. सध्या तुम्हाला ग्रामीण बॅंकेकडून खालील दिलेली कर्ज देण्यात येत आहेत.

ग्रामीण बॅंक कर्ज : ग्रामीण बॅंक तुम्हाला गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, टू व्हीलर कर्ज, कार कर्ज, ऑटो लोन, शैक्षणिक कर्ज, सिक्युरिटीज विरुद्ध कर्ज अशा विविध कामांसाठी तुम्हाला कर्ज प्रदान करण्यात येत आहेत. आता हे कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घेऊया.

ग्रामीण बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
ग्रामीण बॅंकेकडून गृहकर्ज करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, ग्रामीण बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेबसाईटवर आल्यानंतर, वैयक्तिक कर्ज या पर्यायावर क्लिक करा. (Maharashtra Gramin Bank Home Loan).
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
या पेजवर तुम्हाला लोन पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर बॅंकेचे सर्व कर्ज पर्याय दिसतील. ज्या कामासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे तो पर्याय निवडा.
येथे समजा हाउसिंग लोन या पर्यायावर क्लिक केले.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ॲडव्हांटेज एसबीआयच्या पर्यायाखालील Apply Online या पर्यायावर क्लिक करा.


आता तुमच्यासमोर गृहकर्जाचा अर्ज उघडेल.
फॉर्ममध्ये विचारलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्वात शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर, तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर बॅंक तुमच्या कर्जाच्या संबंधित माहिती मोबाईल नंबरवर पाठविल्या जाईल.

ग्रामीण बॅंक हेल्पलाईन क्रमांक
ऑनलाईन कर्ज घेण्यापूर्वी ग्रामीण बॅंक हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. तसेच कर्ज घेण्यापूर्वी बॅंकेशी संपर्क केल्याशिवाय कर्ज घेऊ नका. याची आपण नोंद घ्यावी. ही माहिती आम्ही मिळालेल्या माहितीनुसार देत आहे. याबाबतची संपूर्ण माहिती बॅंकेकडून घ्यावी.

टोल फ्री क्रमांक : 1800112211 / 18004253800

टोल फ्री क्रमांक : 080-26599990 ग्रामीण बॅंकेच्या सेवेबद्दल असमाधानी असल्यास 8008 20 20 20 वर SMS करा.

Maharashtra Gramin Bank Loan अंतर्गत काही कर्ज योजना:

गृहकर्ज योजना: महाराष्ट्र ग्रामीण बँक त्यांच्या घरांचे बांधकाम किंवा नूतनीकरण करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना अत्यंत कमी व्याजदरात आकर्षक कर्ज पर्याय ऑफर करते, ज्यामुळे अनेकांसाठी स्वतःचे घर असण्याचे स्वप्न साध्य होण्यास मदत होते.

वाहन कर्ज योजना: बँक वाहन कर्ज हे दोन प्रकारांमध्ये प्रदान करते. सगळ्यात आधी म्हणजे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी, ज्यामधे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी वाहनाच्या रकमेच्या 90% कर्ज ग्रामीण बँकेकडून दिले जाते. आणि दुसरे म्हणजे, वापरलेल्या किंवा सेकंड हॅण्ड वाहनांसाठी, त्या वाहनाच्या मुद्दल किमतीच्या 70% पर्यंत कर्ज ग्रामीण बँकेकडून मंजूर केले जाते. म्हणजेच जर तुम्ही खरेदी करणार असलेल्या कारची किंमत 1 लाख असेल तर बँकेकडून तुम्हाला 70 हजारापर्यंत कर्ज दिले जाईल.

गोल्ड सिक्युर्ड लोन: गोल्ड सिक्युर्ड लोन स्कीम व्यक्तींना त्यांच्या सोन्याच्या मालमत्तेचा विविध कारणांसाठी फायदा घेऊ देते, ज्यामधे कृषी पीक उत्पादन, व्यवसाय उपक्रम, कौटुंबिक खर्च आणि वैद्यकीय गरजांचा समावेश होतो. अशा अनेक गोष्टींसाठी बँक सोने तारण ठेऊन अत्यंत कमी व्याज दरात ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देते.

वैयक्तिक कर्ज योजना: वैयक्तिक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली ही योजना व्यक्तीच्या मालमत्तेच्या आधारावर कर्ज प्रदान करते. या अंतर्गत कर्ज मर्यादा ही मालमत्तेच्या मूल्यांकन मूल्याच्या 50% आहे. व्यक्ती या आर्थिक सहाय्याचा उपयोग विविध वैयक्तिक गरजांसाठी करू शकतात. कर्जाची रक्कम मालमत्तेच्या मूल्यांकनावर अवलंबून असते.

व्यवसाय कर्ज: महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करून देते. हे कर्ज 25 लाखांपर्यंत उपलब्ध असून 11% व्याजदरावर दिले जाते. या कर्जाचा परतफेड कालावधी हा अधिक असून हे कर्ज घेण्यासाठी भरपूर गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. तुम्हाला या संबंधी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या ग्रामीण बँकेत जाऊन चौकशी करू शकता.

कृषी कर्ज: महाराष्ट्र ग्रामीण बँक पीक लागवड, वृक्ष लागवड, लघु सिंचन, मृदा संवर्धन आणि विविध कृषी प्रयत्नांमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी परवडणारी कर्जे उपलब्ध करून देते. तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन आणि अशाच काही व्यवसायांसाठी देखील बँक शेतकऱ्याला परवडेल असे कर्ज उपलब्ध करून देते.