Maharashtra Pik Vima Yojana महाराष्ट्र राज्य पीक विमा योजना 2023 लाभार्थ्यी यादी जाहीर लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा

Maharashtra Pik Vima Yojana केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नवनवीन योजना राबवून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे प्रयत्न करीत आहे. नैसर्गिक असमतोलामुळे पिकांचे नुकसान होते त्यामुळेच शेतकऱ्यांना फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. म्हणूनच शासनाने प्रधानमंत्री पीक वीमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन त्यांच्या पिकांचा विमा काढता येतो. विम्याची उर्वरीत रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून भरतात आणि शेतकऱ्यांचे पिक आले नाही, दुष्काळ, अतीपाऊस सारख्या नैसर्गिक हानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना झालेल्या नुकसानीच्या बदल्यात आर्थिक मदत केली जाते.

महाराष्ट्र राज्य पीक विमा योजना लाभार्थी यादी 2023

https://pmfby.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही पीक विमा योजना 2023 अंतर्गत जाहीर झालेल्या यादीमध्ये तुमचे नाव तपासू शकता.

महाराष्ट्र राज्यातील १ कोटी 70 लाख आणि ६७ हजार शेतकऱ्यांनी 2023 मध्ये  पिक विमा भरला होता. यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ १ रु. भरुन पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आणि उर्वरित सर्व रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळेच यावर्षी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा भरला होता. Maharashtra Pik Vima Yojana 2023

महाराष्ट्र राज्यातील पिक विमा योजने अंतर्गत जिल्हे निवडण्याचे निकष

ज्या जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील ज्या मंडळात  सलग 21 दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडला नाही त्या मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.  पिक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्न घट झाली हे सूचित होत असल्यास 25% आगाऊ पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरतात आणि सोबतच या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते

Pik Vima Yadi 2023 जाहीर झाली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत  महाराष्ट्राच्या राज्यातील तब्बल 231 मंडळांना आता आगाऊ पिक विमा मिळणार आहे.

पीक विमा अंतर्गत येणारी पीके

पीक विमा योजना 2023 योजनेमध्ये काही निवडक पिकांचाच समावेश आहे.

पीक विमा जाहीर करतानाच शासनातर्फे नेमक्या पीकींचा त्यात समावेश करण्यात आला होता. खरीप हंगामातील बाजरी, भुईमुग, ज्वारी, तांदूळ, नाचणी, मका, मुग, उडीद, तूर, सोयाबीन, कारले, कापूस, कांदा, तीळ या केवळ  14 पिकांचा समावेश हा पीक विमा योजनेत करण्यात आला होता. या पिकांची निवड करताना महाराष्ट्रतील विविध भागांचा अभ्यास करुनच निवड केली आहे.  

पीक विमा योजनेचा अर्ज

तुम्ही पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या पिकांचा विमा काढू इच्छित असाल तर पुढील वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमच्या पिकाचा विमा काढू  शकता.

https://www.pmfby.gov.in

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीब हंगाम 2023-24

पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र

https://drive.google.com/file/d/1A6yafgpck6cd5UvXW3GrZK7XT9wOIuQm/view

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजना 2023-24 योजना राबवण्याता आली आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास  तलाठी किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने त्या पिकांचे पंचनामे करून संबंधित कंपन्यांना आदेश देण्यात येतात. नैसर्गिक आपत्तीपासून झालेल्या नुकसानीची  शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी तसेच विविध रोगांचा पिकांवर होणारा परिणाम अशा अनेक नैसर्गिक आपत्तीचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे.

पीक विमा देणाऱ्या कंपन्यांची यादी

शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठीचा पीक विमा देण्यासाठी  काही विमा कंपन्यांची निवड केलेली आहे. ही कंपन्यांची जिल्ह्यानुसार यादी पुढील प्रमाणे.

  • परभणी,वर्धा,नागपूर  – आय सी आय सी आय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
  • अहमदनगर,सोलापूर,सातारा,जळगाव,नाशिक –  ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
  • रत्नागिरी,सिंधुदुर्ग, ठाणे  – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
  • पुणे,धाराशिव,धुळे,हिंगोली,अकोला – एच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि
  • कोल्हापूर,गोंदिया,जालना – युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.
  • सांगली,वाशीम,बीड,बुलढाणा,नंदुरबार,वाशीम – भारतीय कृषी वीमा कंपनी
  • रायगड,औरंगाबाद,पालघर,भंडारा – भारतीय कृषी वीमा कंपनी
  • रायगड,औरंगाबाद,पालघर,भंडारा – चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

लातूर जिल्हा – एम बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.