Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025: लाडक्या बहिणींसाठी सरकारची नवी योजना… महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे सरकारचं मोठं पाऊल!

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025: एक वेळ अशी होती की अनेक महिलाना आपल्या घरासाठी स्वतःच्या इच्छांना लपवून ठेवावं लागत होतं. आजही काही ठिकाणी ही परिस्थिती दिसते. पण त्याच वेळी अनेक महिलांनी आपले संसार सांभाळत, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहिलं. आता काळ बदलतोय… आणि त्या स्वप्नांना पंख देणारा निर्णय घेतलाय महाराष्ट्र शासनाने. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” मुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला, आणि आता त्याच संकल्पनेतून पुढे आलेली “पिंक ई-रिक्षा योजना” (Pink E Rickshaw Scheme Maharashtra) म्हणजे खरंच सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाचं गिफ्ट आहे.

राज्यातील १०,००० गरजू महिलांना स्वतःची रिक्षा देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. या योजनेअंतर्गत महिलांना “पिंक ई-रिक्षा” वितरित करण्यात येणार आहेत. आणि विशेष म्हणजे ही योजना फक्त नागपूरपुरती मर्यादित नाही, तर या योजनेचा पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही हळूहळू विस्तार करण्यात येणार आहे.

अनेक महिलांनी योजनेच्या पहिल्याच टप्प्यात अर्ज केले आणि केवळ नागपूरमध्येच तब्बल ११,००० अर्ज दाखल झाले होते. त्यातील २,००० महिलांना त्यांच्या हातात सशक्ततेचं स्टीयरिंग देण्यात आलं आहे.

अर्थसहाय्याची जबाबदारी सरकारने उचलली

पिंक ई-रिक्षा योजनेची रचना अशी आहे की, एकूण किंमतीपैकी २०% अनुदान शासन देणार आहे, तर फक्त १०% रक्कम लाभार्थी महिलेला भरायची आहे. उर्वरित ७०% रक्कम अत्यल्प व्याजदरात कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच, घर चालवणाऱ्या, लेकरांसाठी लढणाऱ्या माऊलीच्या खिशावर ताण न येता ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते.

फक्त रोजगार नाही, सुरक्षिततेचंही साधन

या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे महिलांद्वारे चालवलेल्या पिंक ई-रिक्षा म्हणजे सुरक्षित प्रवासाचा पर्याय असणार आहे. रात्री किंवा एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पिंक ई-रिक्षा (Pink E Rickshaw Scheme Maharashtra) एक विश्वासार्ह व सुरक्षित साधन ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यामागे महिलांना फक्त आर्थिक नाही तर सामाजिक सशक्तता मिळावी, हा हेतू ठेवलेला आहे.

कसा करायचा अर्ज? | Pink E Rickshaw Online Form

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच ऑनलाईन सुरू होणार आहे. संबंधित जिल्हा प्रशासन आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येईल. आवश्यक त्या कागदपत्रांसह महिला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकतील. त्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो लागणार आहेत.

ही योजना म्हणजे केवळ एका रिक्षेचं वाटप नाही, तर महिलांसाठी एक मोठी संधी आहे. ज्या महिला घरातच कैद झाल्या आहेत, त्यांना बाहेरचं जग पाहण्याची, स्वतः काहीतरी करून दाखवण्याची संधी देणं म्हणजे खरोखरच सशक्तीकरण च्या दिशेने मोठं पाऊल आहे. “माझी लाडकी बहीण आता केवळ आई, बहीण, पत्नी नाही तर चालक, उद्योजिका, आणि स्वतःच्या आयुष्याची मालकीण सुद्धा बनणार आहे” सर्व पात्र महिलांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. Pink E Rickshaw Yojana in Marathi