Maharashtra Voter List Download: गाव असो, शहर असो किंवा असो महानगरपालिका, 2 मिनिटांत डाउनलोड करा मतदार यादी!

Maharashtra Voter List Download: मित्रांनो, मतदान म्हणजे आपल्या लोकशाहीचा आपला सर्वात मोठा हक्क. कोणाचं सरकार कोणाच्या हातात जाणार ते ठरवण्याचं सामर्थ्य प्रत्येक नागरिकाच्या मतात असतं. परंतु हा हक्क वापरायचा तर आपल्या नावाचा मतदार यादीत (Voter List) समावेश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

पूर्वी मतदार यादीत नाव तपासण्यासाठी किंवा यादी मिळवण्यासाठी लोकांना पंचायत (Gram Panchayat Voter List Download) कार्यालय, नगरपरिषद किंवा तहसील कार्यालयात जाऊन तासन् तास रांगेत उभं राहावं लागायचं. परंतु आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. आणि याअंतर्गत भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदार यादी ऑनलाईन स्वरूपात देखील उपलब्ध करून दिली आहे.

याचाच अर्थ असा की आता तुम्ही घरबसल्या मोबाईलमधूनच तुमच्या गावाची किंवा शहराची संपूर्ण मतदार यादी PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. यासोबतच त्याद्वारे तुम्ही,

  • तुमचं नाव (How to Check Name in Voter List Online) मतदार यादीत आहे की नाही ते तपासू शकता.
  • तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे पाहू शकता.
  • पत्ता किंवा इतर माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करू शकता.
  • नाव नसेल तर नवीन नोंदणी कधी आणि कशी करायची तेही समजून घेऊ शकता.

मतदार यादी ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मतदार यादीतील विविध (Download Electoral Roll PDF Maharashtra) प्रकार समजून घ्या

1. General Election List | सामान्य निवडणूक यादी

सर्व नागरिकांना आपली माहिती तपासता यावी म्हणून ही यादी राज्य किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी तयार केली जाते.

2. Draft Roll List | तात्पुरती (ड्राफ्ट) यादी

ड्राफ्ट यादीमध्ये पुरेशी माहिती नसलेली, चूक किंवा अपडेटची गरज असलेली नावे असतात. लोकांना त्यांच्या माहितीमध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी याद्वारे दाखवल्या जातात.

3. Final Roll List | अंतिम मतदार यादी

चुका दुरुस्त करून अधिकृत अंतिम यादी तयार केली जाते. या यादीतील नावावरूनच पुढे मतदान करता येते.

4. Supplement List | पूरक यादी

Final List नंतर आलेल्या नवीन अर्जाधारकांची नावे या यादीत जोडली जातात. म्हणजे या यादीत नाव असेल तरी तुम्ही मतदान करू शकता.

आज मतदार यादी पाहणं आणि डाउनलोड करणं खूपच सोपं, मोफत आणि वेळ वाचवणारं झालं आहे. फक्त काही क्लिकमध्ये तुम्ही तुमच्या गावाची यादी पाहू शकता आणि मतदानाचा (Maharashtra Voting List Online) हक्क निश्चित करू शकता. तर मित्रांनो तुमचं नाव Final List मध्ये आहे की नाही हे नक्की तपासा. कारण तुमचं नाव नसेल तर तुमचं मत वाया जाणार आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी तुमचं एक मत सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून नाव तपासा, माहिती अपडेटेड अद्ययावत ठेवा आणि मतदान जरूर करा.