MahaTransco Bharti 2024: महापारेषण या शासकीय कंपनीमध्ये 4494 जागांवर बंपर भरती; असा करा ऑनलाईन अर्ज

MahaTransco Bharti 2024: तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपलाच म्हणून समजा कारण महापारेषण या शासकीय कंपनीमध्ये  बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. महापारेषण ही महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाची वीजपारेषण कंपनी आहे. या शासकीय कंपनीमध्ये तब्बल 4494 रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत भरतीची जाहीरात निघाली आहे. विविध पदांसाठी ही जाहीरात असून प्रत्येक पदासोबत येथे जाहिरातीची लिंक देखील आम्ही दिली आहे.

आवश्यक वयोमर्यादा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी 18 ते 57 वर्षापर्यंत असावे ही वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी त्या त्या पदासाठीची जाहीरात पहावी. MahaTransco Bharti 2024

महापारेषणच्या भरती प्रक्रियामध्ये खालील पदांचा समावेश असणार आहे

  • कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाच्या 25 जागा रिक्त असून पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही जाहिरात पाहू शकता.

https://drive.google.com/file/d/1iKPxyXAhOKYA-HcqRY8c1oV7-GDDPpjh/view

  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाच्या 133 जागा रिक्त असून त्या जागांसाठी भरती जाहिर करण्या आली आहे. या संदर्भातील जाहिरात पुढील लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.

https://drive.google.com/file/d/10AkFV6UteBMiWa21D93c3pUMN3_bCQGl/view

  • उपकार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाच्या 132 जागा रिक्त आहेत. त्यासाठीची  शासकीय जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करु शकताय

https://drive.google.com/file/d/1aWIjQBpyp9Ak1oZ3MR44ZAgpTMUu5kNl/view

  • सहाय्यक अभियंता (पारेषण) या पदासाठी 419 रिक्त जागा असून सहाय्यक अभियंता (दूरसंचार) या पदाच्या  09 जागा रिक्त असल्याचे महापारेषण विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या जाहिरातीत सांगण्यात आले आहेत. अधिक मांहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही जाहिरात पाहू शकता.

https://drive.google.com/file/d/17ZUCV7rD5jDNoapbjcZvUwZI-FzTfbQx/view

  • वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)  या पादासाठी 126 जागा,  तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)  पदासाठी 185 जागा आणि तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) पदासाठी 293 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करु शकता. https://drive.google.com/file/d/1SBG-IX2R2GFtKIdkBQm4Dh3ew7V0vXJw/view
  • विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) या पदासैठी  2623 जागांवर भरती जाहिर करण्यात आली आहे, यासंदर्भातील जाहिरात पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही पाहू शकता.

https://drive.google.com/file/d/1qBhb4tYdX5EcfnSxZBJraTZHuQ3lGN0V/view

सहाय्यक अभियंता (पारेषण) या पदाच्या 132 जागा आणि  वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदासाठी 92 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1PW93eB9yHRSqh4_I2dIWJ17V0CMjnDS_/view

  • तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) या  पदाच्या 125 जागा  आणि  तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदाच्या 200 जागांवर पदभरती होणार असून या दोन्ही जागांची जाहिरात  पाहण्यासाठी पुढील लिंकवर

https://drive.google.com/file/d/1m4AC6U_C6FKqqkIfc4rWAICq8sVUYitu/view

अर्ज भरताना किती शुल्क द्यावे लागेल

महापारेषण कंपनीअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या महाभरतीमध्ये विविध पदांसाठी शुल्क देखील वेगवेगळे असणार आहेत. तरी 350 रु. ते 700 रुपयांपर्यंत हे परीक्षा शुल्क अर्जदार उमेदवारांना भरावे लागणार आहेत. ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.