Mazi ladki bahin yojana: योजनेच्या अटींमध्ये मोठे बदल.. आता या महिलांना भरता येणार नाही अर्ज.. अर्जाची शेवटची तारीख ही बदलली…

Mazi ladki bahin yojana: महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वत: सांगितले की, “कुठलीही शंका घेऊ नका, 31 ऑगस्ट ही या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.” 8 जुलैपासून जिल्ह्यातील सगळ्या पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

‘माझी लाडकी बहिन योजना’ महाराष्ट्रात राबविण्यात येत असून त्याबाबत महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या योजनेच्या काही अटींमध्ये 3 जुलै रोजी सरकारने मोठे बदल केले आहेत. आता 21 ते 65 वयोगटातील असणाऱ्या घटस्फोटित, विवाहित, परित्यक्ता किंवा निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच प्रत्येक कुटुंबातील एकल महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. Mazi ladki bahin yojana

कोणत्या महिला ‘या’ योजनेसाठी पात्र होणार नाहीत? | Eligibility criteria

नवीन बदलांनुसार, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेसाठी ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, त्या महिला पात्र असतील.

तसेच, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान प्राप्त करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आवाहन करत असे सांगितले आहे की या योजनेसाठी अशा महिलांनी अर्ज करू नये.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आवाहन करून असे सांगितले आहे की, अर्ज करताना कोणीही कुठल्याही प्रकारची घाई करू नये. सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयांमुळे ही योजना अत्यंत सोपी आणि सरळ केलोज आहे. यासोबतच आता पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी इतर अन्य पुरावा लागणार नाही.

रहिवासी पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, 15 वर्षे जुने रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, ही कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार आहेत. रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणार नाही. इतर राज्यामधील ज्या विवाहित महिला असणार आहेत, तर त्यांच्या साठी त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडली असल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार आहे. Mazi ladki bahin yojana

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे की 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज सादर करता येतील. प्रत्येक गावामधे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून 8 जुलैपासून शिबिरांचे आयोजन केले जाणार असून, आणि या शिबिरांद्वारे महिला अर्ज करू शकणार आहेत.

आता या योजनेसाठी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी करण्यात आली आहे. महिलांनी कोणत्याही मध्यस्थाला बळी पडू नका, असे आवाहन केले जात आहे. यासाठी अर्ज तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमच्या घरात असणाऱ्या तरुण सदस्याद्वारे देखील अर्ज करून घेऊ शकता. फोटो काढून आणि सोबतच इतर माहिती सगळी भरून ई-केवायसी करता येणार आहे. सरकारतर्फे आयोजित शिबिरांमधूनही महिलांना मदत मिळणार आहे. Mazi ladki bahin yojana