MHADA Konkan Lottery 2024 Result: अखेर मुहूर्त ठरला! “या” तारखेला जाहीर होणार म्हाडाच्या 2147 घरांची लॉटरी..

MHADA Konkan Lottery 2024 Result: मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे! परवडणाऱ्या किंमतीत घर घेण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) पुन्हा एकदा मोठी संधी घेऊन आले आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने ५ फेब्रुवारी २०२५ रोजी २१४७ घरांची आणि ११० भूखंडांची संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. ही लॉटरी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता जाहीर केली जाईल, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

म्हाडाच्या या उपक्रमामुळे सामान्य जनतेचे परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. घरांच्या वाढत्या किमतींमुळे सध्या बाजारात परवडणारे घर उपलब्ध असणे आणि ते विकत घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे म्हाडा हेच घर खरेदीसाठी सर्वोत्तम पर्याय बनत आहे.

म्हाडाच्या सोडतीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद | Response to MHADA Lottery

म्हाडाच्या या सोडतीसाठी लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या घरांसाठी एकूण २४,९११ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. ही संख्या पाहता लोकांच्या विश्वासाला योग्य असा प्रकल्प म्हाडा उभा करत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. अर्ज प्रक्रिया ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाली होती आणि ६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजता संपली. परवडणाऱ्या किमती आणि खरेदी विक्रीतील पारदर्शकता यामुळे म्हाडाच्या घरांसाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचं बघायला मिळत आहे.

सोडतीत सहभागी होणाऱ्या घरांची आणि भूखंडांची माहिती

म्हाडाच्या कोकण मंडळाने (MHADA Konkan board lottery on Feb 5) ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत सदनिका व भूखंड बांधले आहेत. या सोडतीमध्ये दोन प्रकारांतील घरांचा समावेश असणार आहे:

  • २१४७ सदनिका ह्या कोकण मंडळातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उपलब्ध असतील
  • तर ११० भूखंड विक्रीसाठी खुले असणार आहेत.

सोडतीचा दिवस आणि ठिकाण

सोडत संगणकीय पद्धतीने पारदर्शकपणे काढण्यात येणार असल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत होणार आहे. अर्जदारांना सोडतीच्या ठिकाणी योग्य वेळेत उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या सोडतीचा निकाल म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरही पाहता येणार आहे.

अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना

सोडतीत सहभागी होणाऱ्या अर्जदारांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे.

  • सर्व अर्जदारांनी सोडतीच्या ठिकाणी वेळेत पोहोचणं आवश्यक आहे.
  • ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणं शक्य नसेल त्यांना हा निकाल पाहण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळाला mhadalottery.gov.in भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  • तसेच अर्जाच्या सर्व माहितीची सत्यता तपासली जाईल, त्यामुळे सर्व कागदपत्रं वेळेत सादर करणं गरजेचं आहे.

म्हाडाच्या घरांची वैशिष्ट्यं

म्हाडाच्या योजनेंतर्गत बांधलेली घरं केवळ परवडणारीच नाहीत, तर टिकाऊ आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असतात.

ही घरे अत्यंत काळजीपूर्वक डिझाइन केली आहेत, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना त्यांना हवे असेच घर उपलब्ध असेल.

या घरांच्या किमती ह्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अश्याच आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमी असल्याने ही घरं खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरतात.

यासोबतच ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

म्हाडाचे घरच का निवडावे?

  • म्हाडाच्या घरांच्या किमती ह्या बाजारपेठेच्या तुलनेत कमी असतात, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही एक मोठी संधी ठरते.
  • यासोबतच शासनमान्य प्रकल्प असल्याने म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम असते.
  • याशिवाय म्हाडाची घरं अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून दीर्घकाळ टिकणारी आहेत.
  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी कमी अनामत रक्कम लागते, ज्यामुळे जास्त लोकांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध होते.

यशस्वी अर्जदारांसाठी पुढील प्रक्रिया

म्हाडाच्या या लॉटरी मधे ज्या उमेदवारांच्या नावाची निवड होईल, त्यांना म्हाडाकडून अधिकृत सूचना पाठवल्या जातील. त्यानंतर त्या सर्व उमेदवारांना आवश्यक कागदपत्रं आणि योग्य ती रक्कम सादर करून घराचा ताबा घेण्याची प्रक्रिया पार पाडावी लागेल. योग्य कागदपत्रं सादर न केल्यास त्यांची निवड रद्द केली जाऊ शकते.

लक्षात ठेवा, ५ फेब्रुवारी २०२५ हा दिवस म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या लॉटरीनंतर अनेक कुटुंबं परवडणाऱ्या किमतीत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतील. जर तुम्हीही अर्ज केला असेल, दिलेल्या पत्त्यावर योग्य वेळी उपस्थित राहा किंवा अधिक माहितीसाठी आणि निकाल पाहण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला mhadalottery.gov.in भेट द्या.