Mofat Pithachi Girani yojana: कधी घरखर्च चालवताना प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवावा लागतो, तर कधी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यावं लागतं, अशा अनेक अडचणी ग्रामीण महिलांच्या वाट्याला येतात. पण आता एक छोटीशी आशा त्यांच्या दरवाजापर्यंत आली आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मोफत पिठाची गिरणी योजना ही केवळ योजना नसून, ती अनेक महिलांच्या स्वप्नांना बळ देणारी एक संधी आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची ही एक सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेद्वारे (Free Flour Mill Scheme for Women) महिलांना मोफत किंवा अत्यल्प दरात पिठाची गिरणी देण्यात येते. ही गिरणी मिळाल्यावर त्या महिलांना गावातच छोटा व्यवसाय सुरू करता येणार आहे ज्यातून त्यांची रोजची कमाईही सुरू होऊ शकते, आणि हळूहळू त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात.
या योजनेचा उद्देश केवळ रोजगार देणं नाही, तर महिलांना एक नवा आत्मविश्वास देणं आहे. विशेषतः अनुसूचित जाती व जमातींतील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांत आजही पुरुषांवरच सगळा भार असतो, पण ही योजना महिलांना त्या पारंपरिक चौकटीबाहेर येण्याची ताकद देते.
पिठाची गिरणी म्हणजे रोजच्या जीवनाशी निगडित व्यवसाय असून, गावात दररोज धान्य दळण्याची गरज ही असतेच. त्यामुळे हा व्यवसाय कधीही थांबत नाही. शिवाय त्यासाठी फार मोठं शिक्षण किंवा तांत्रिक ज्ञानही लागत नाही. सरकारकडून या गिरणीसाठी तब्बल ९०% अनुदान दिलं जातं, म्हणजे महिलांना फक्त १०% खर्च करावा लागतो. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं, तर ३० हजारांची गिरणी असेल, तर केवळ ३ हजारांतच हा व्यवसाय सुरू करता येतो.
योजनेचा उद्देश | Mofat Pithachi Girani Yojana Objective
या योजनेमागे फक्त व्यवसाय उभा करण्याचा हेतू नाही, तर महिलांना “मी सुद्धा काही काम करू शकते” ही जाणीव देणं हेही एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.
- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं
- ग्रामीण भागात लघुउद्योगांना चालना देणं
- महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण
- अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना आत्मनिर्भर बनवणं
- कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणं
ही योजना कशी कार्य करते? | Free Chakki for Women in Maharashtra
या योजनेंतर्गत महिलांना ९०% अनुदान देण्यात येते. म्हणजेच: ३०,००० रुपयांच्या गिरणीसाठी महिलेला फक्त ३,००० रुपये भरावे लागतात आणि उर्वरित २७,००० रुपये सरकारकडून दिले जातात. अशाप्रकारे अत्यल्प गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याची ही एक मोठी संधी आहे.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रं | Important Documents for Free Flour Mill Yojana
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र (SC/ST)
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्
- महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र
- बँक पासबुक किंवा स्टेटमें
- अलीकडील पासपोर्ट साईज फोटो
- BPL कार्ड (असल्यास)
- शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन
अर्ज कसा कराल? | How to apply Free Flour Mill Scheme
- यासाठी सगळ्यात आधी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात भेट द्या.
- त्यानंतर अर्जाचा फॉर्म घ्या व सर्व माहिती नीट भरून घ्या.
- यासोबतच आवश्यक कागदपत्रं जोडा.
- हा भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात सादर करा
- ह्या अर्जाची पडताळणी झाल्यावर तुम्हाला यासाठी अनुदान मंजूर केलं जाईल. आणि हे मंजूर झालेलं अनुदान थेट बँक खात्यात जमा केलं जाईल.
या योजनेचा फायदा किती मोठा आहे, हे हिंगोली जिल्ह्यातील उदाहरणावरून कळतं. २०२४-२५ या वर्षात तिथे जिल्हा परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून १०६ महिलांना मोफत पिठाच्या गिरण्या देण्यात आल्या. आज त्या महिला स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांना इतर कोणापुढेही हात पसरावे लागत नसून, त्या आज आत्मनिर्भरतेने जगत आहेत.