MPSC Exam 2026: महाराष्ट्र गट-क सेवेच्या 938 पदांसाठी मोठी भरती जाहीर! इथे जाणून घ्या परीक्षा तारीख, पात्रता, अर्ज फी…

MPSC Exam 2026: महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी आता मोठी आनंदवार्ता समोर आली आहे! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Group C Recruitment 2026) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी नवी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते, कारण यावेळी तब्बल 938 पदांसाठी ही भरती होणार आहे.

या परीक्षेद्वारे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपिक टंकलेखक या महत्त्वाच्या पदांवर भरती होणार आहे. एमपीएससीकडून ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून, पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा असेल.

गट-क सेवेत एकूण किती जागा असणार आहेत?

या जाहिरातीनुसार (MPSC Group C Notification) उद्योग निरीक्षक पदासाठी 9 जागा, तांत्रिक सहायकसाठी 4 जागा, कर सहायकसाठी 73 जागा, तर लिपिक टंकलेखक पदासाठी तब्बल 852 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच बहुसंख्य जागा लिपिक आणि कर सहायक संवर्गातील उमेदवारांसाठी आहेत. 

अर्ज सादर करण्याची तारीख आणि प्रक्रिया

या भरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज (MPSC Online Application) प्रक्रिया 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता सुरू झाली असून, 27 ऑक्टोबर 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. या तारखेपर्यंत (MPSC Prelims Exam Date) ऑनलाइन परीक्षा शुल्क देखील भरता येईल. ज्यांना State Bank of India च्या शाखेतून चलनाद्वारे शुल्क भरायचं आहे, त्यांना 29 ऑक्टोबर रात्रीपर्यंत शुल्क भरावं लागेल, आणि त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी कार्यालयीन वेळेत शाखेत जाऊन हे चलन सादर करावं लागेल.

पात्रता आणि शैक्षणिक अर्हता

उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक गट-क संवर्ग वगळता इतर सर्व पदांसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने समकक्ष म्हणून मान्य केलेली अर्हता असावी. उद्योग निरीक्षक पदासाठी मात्र थोडी वेगळी पात्रता आहे, त्यासाठी उमेदवाराकडे स्थापत्य अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी, अथवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वरील सर्व पात्रता (MPSC Group C Eligibility) निकष नीट तपासूनच उमेदवारांनी अर्ज करावा.

परीक्षा पद्धत

गट-क सेवा परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होईल, संयुक्त पूर्व परीक्षा (100 गुणांची) आणि संयुक्त मुख्य परीक्षा (400 गुणांची). त्याशिवाय, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पदांसाठी उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देखील द्यावी लागेल. त्यामुळे उमेदवारांनी शैक्षणिक तयारीसोबतच टंकलेखन कौशल्यावरही लक्ष केंद्रित करणं आवश्यक असणार आहे.

परीक्षा फी

पूर्व परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹394, तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना ₹294, आणि माजी सैनिकांना फक्त ₹44 रुपये फी भरावी लागेल. मुख्य परीक्षेसाठी ही फी, खुल्या प्रवर्गासाठी ₹544, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी ₹344, आणि माजी सैनिकांसाठी पुन्हा ₹44 रुपये असणार आहे.

आपल्या सगळ्यांनाच माहित असल्याप्रमाणे महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा ही राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने (Sarkari Naukri Maharashtra) योग्य प्रकारे अभ्यासाचे नियोजन करणे, सध्याच्या घडामोडींचा अभ्यास करणे, आणि गेल्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक ठरणार आहे. उमेदवारांनी विशेष करून लक्षात ठेवा की अर्ज सादर करताना सर्व माहिती अगदी तपासून आणि नीट भरणं गरजेचं असणार आहे, कारण एक छोटी चूकही तुमचा अर्ज रद्द होण्यास कारणीभूत ठरू शकते.