MPSC FDA Recruitment 2025: FDA विभागात नोकरीची उत्तम संधी! MPSC मार्फत भरती जाहीर, पगार १.३२ लाख…

MPSC FDA Recruitment 2025: नमस्कार मंडळी, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंददायक आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात (Food and Drug Administration) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) औषध निरीक्षक (गट ब) (MPSC Group B Vacancy Details) पदांसाठी भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही भरती एकूण १०९ पदांसाठी केली जाणार असून, या माध्यमातून तरुण आणि पात्र उमेदवारांना राज्यातील सरकारी सेवेत दाखल होण्याची एक सुवर्णसंधीच प्राप्त झाली असल्याचं म्हणावं लागेल.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना S-15 वेतनश्रेणीनुसार मासिक वेतन हे ४१,८०० रुपयांपासून सुरू होऊन १,३२,३०० रुपयांपर्यंत मिळू शकणार आहे. तसंच याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर सर्व शासकीय भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे. म्हणजेच उमेदवारांना केवळ आर्थिक स्थैर्यच नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी देखील ही एक उत्तम (MPSC Recruitment Apply Online) संधी असणार आहे.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही भरती करण्यात येणार असून, सगळ्या इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsconline.gov.in जाऊन ऑनलाईन पद्धतीने आणि योग्य ती माहिती भरून अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

या पदांतर्गत पात्र होण्यासाठी उमेदवाराकडे फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिन यापैकी एक पदवी असणे आवश्यक असणार आहे. उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावी. अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय आणि इतर आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात यर्नार आहे.

उमेदवारांची निवड प्रक्रिया (MPSC FDA Online Application Process) तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये सगळ्यात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घराण्यात येईल आणि शेवटी व्यक्तिमत्व चाचणी (Personality Test) घेण्यात येईल. त्यानंतर या प्रक्रियेतील यशस्वी उमेदवारांना अंतिम निवड यादीमध्ये समाविष्ट करून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

राज्यातील फार्मसी, मेडिसिन किंवा विज्ञान शाखेत पदवीधर असलेल्या तरुणांसाठी ही संधी केवळ सरकारी नोकरीसाठीच नाही, तर समाजाच्या आरोग्य रक्षणात सक्रिय योगदान देण्याची संधी आहे. FDA मधील औषध निरीक्षक पद हे केवळ एक नोकरी नसून, जनतेच्या आरोग्यासाठी संरक्षक बनण्याची जबाबदारीही आहे.

म्हणूनच, जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल आणि सरकारी नोकरीसाठी (Government Jobs in Maharashtra 2025) एक संधी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक निर्णायक वळण ठरू शकते. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच तयारी सुरू करा आणि १ ऑगस्टपासून सुरु झालेल्या या अर्ज प्रक्रियेत तुमचा अर्ज नोंदवा. या भरती विषयक अधिक माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्या.