
MSRTC Recruitment 2025: शासकीय क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक आणि आशादायक अशी बातमी समोर आल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळाने नाशिक विभागात विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली असून या भरतीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातील सगळ्याच इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरणार असल्याचं बघायला मिळत आहे.
शासकीय नोकरी म्हणजे केवळ पगार नाही, तर त्यामागे असते ते स्थैर्य, सन्मान, आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य. अशाच एक सुवर्णसंधीची घोषणा MSRTC ने नुकतीच केली आहे. नाशिक विभागामार्फत एकूण ३६७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि ही भरती अगदी प्रशिक्षणार्थी पदांपासून सुरुवात करून एका ठोस सरकारी सेवेकडे नेणारी वाट ठरू शकते.
किती जागा आणि कोणकोणती पदे उपलब्ध?
या भरतीत अनेक तांत्रिक आणि अभियांत्रिकी पदांचा समावेश आहे. या भरतीद्वारे एकूण ३६७ रिक्त पदे (MSRTC Apprentice Vacancy) भरली जाणार आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची पदं खालीलप्रमाणे आहेत:
- अभियांत्रिकी पदवीधर
- इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक
- मॅकेनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग)
- मॅकेनिक मोटार व्हेईकल
- शिटमेटल वर्कर
- वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)
- पेंटर
- मॅकेनिक डिझेल
- इलेक्ट्रिशियन
- फिटर
- टर्नर
- कारपेंटर
आवश्यक पात्रता काय?
वयोमर्यादा:
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १४ ते ३० वर्षे असणं आवश्यक आहे. त्यामुळे दहावी-बारावी पूर्ण केल्यावरही जर तुमच्याकडे आवश्यक प्रशिक्षण किंवा स्किल्स असतील, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. काही पदांसाठी अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा असणे सुद्धाआवश्यक आहे.
भरती प्रक्रिया कशी असेल?
- या भरतीसाठी तुम्हाला सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर पुढील स्टेप्स अशा असतील:
- नाशिक विभागीय एसटी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज (MSRTC Application Form) नमुना घ्या.
- आवश्यक माहिती व कागदपत्रांसह अर्ज पूर्ण भरा.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे, त्यामुळे वेळेआधी प्रक्रिया पूर्ण करा.
भरतीचं विशेष आकर्षण काय आहे?
- या भरती प्रक्रियेत तुम्हाला प्रशिक्षणाअंतर्गत मानधन दिलं जाईल. जरी सुरुवातीला ही भरती प्रशिक्षणार्थी पदांसाठी असली तरी यामध्ये उमेदवारांना ठराविक प्रमाणात मानधन दिलं जातं.
- तसेच तुम्हाला काही सरकारी फायदे सुद्धा मिळू शकतात. या नोकरीत पुढे अनुभव मिळाल्यावर आणि परफॉर्मन्सनुसार तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी पद मिळवण्याची संधी देखील असते.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं (MSRTC Recruitment Documents):
- शैक्षणिक प्रमाणपत्रं (ITI / Diploma / Degree)
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र (जर लागू होत असेल तर)
- रहिवासी प्रमाणपत्र
- NATS किंवा Apprenticeshipindia नोंदणी तपशील
- बँक पासबुक (मानधनसाठी)
अर्ज कुठे करायचा?
अर्ज करण्यासाठीचा पत्ता:
नाशिक विभागीय एसटी कार्यालय
एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक
अर्ज प्रत्यक्ष कार्यालयातच (ST Bharti 2025 Nashik) सादर करायचा आहे. त्यामुळे नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करून, तुम्हाला अर्ज हा ऑफलाइनच सबमिट करावा लागणार आहे. तसेच ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.
तर मित्रांनो, जर तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतलेलं असेल आणि सरकारी नोकरीत रुजू होण्याचं स्वप्न पाहत असाल, तर MSRTC (Government Jobs Maharashtra) मध्ये नोकरी करण्याची ही योग्य वेळ आहे. अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी आतापासून करा आणि ११ ऑगस्टपूर्वी तुमचा अर्ज सादर करा.