NAMO Shetakari Yojana 2023: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023

NAMO Shetakari Yojana 2023

NAMO Shetakari Yojana 2023 महाराष्ट्रात नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पीक चांगले यावे यासाठी विविध योजना  शासनाकडून राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना. 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा सर्वप्रथम केली होती.  तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या योजनेला सहमती दर्शवली होती. मोदी सरकारने  शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष  प्रत्येक शेतकऱ्याला  ६००० रु. इतके अनुदान देण्यात येते. त्यात भर म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने आणखी ६००० इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबवण्याचा निर्णय जून २०२३ मध्ये घेतला.

या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याआधी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येत होते.आणि आता राज्य सरकारमार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत 6000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्रता व अटी

 • लाभ घेणारा शेतकरी अल्पभूधारक असावा. ( किमान ५ एकर पेक्षा कमी क्षेत्र त्या शेतकऱ्याच्या नावावर असावे.)
 • लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकच कोणीतरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी कोणीही किंवा कुटुंबातील कोणीही  खासदार, आमदार, नगरसेवक, जि.प.सदस्य किंवा पं.स.सदस्य असू नये.
 • लाभार्थी शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
 • लाभार्थी शेतकरी Income Tax भरणारा नसावा.
 •  अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र ८ अ उतारा असणे अनिवार्य आहे.
 •  २०१९ च्या आधी अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर जमीन झालेली असावी, तरच त्यांना या योजनाचा लाभ घेता येईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

 • https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx या लिंकवर क्लिक करून वेबसाईट वर जा.
 •  समोर आलेल्या पेजवरील “Rural Farmer Registration” या  पर्यायावर क्लिक करा
 • वेबसाईट वर आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. अर्जदार शेतकऱ्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
 • यानंतर महाराष्ट्र राज्य निवडून मोबाईलवर आलेला OTP टाकून तुम्हाला पुढे जायचे आहे.
 • त्यानंतर फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये जिल्हा,तालुका,गाव निवड करुन योग्य ती माहिती भरावी.
 • आर्जदार शेतकऱ्याला त्यांचा योग्य तो “Land Registration ID” टाकायचा आहे.
 • रेशन कार्डचा नंबर देखील या फॉर्म मध्ये तुम्हाला भरायचा आहे.
 •  शेतकऱ्यांनी जमिनीची माहिती – खाते नंबर,गट नंबर,क्षेत्र सर्व माहिती सविस्तर भरायची आहे.
 •  आधार कार्ड आणि ७/१२ चा फोटो अपलोड करायचे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजना 2023 संदर्भातील महत्त्वाच्या वेबसाईट्स आणि लिंक्स

 • नमो शेतकरी महासन्मान योजना 2023 अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx या वेबसाईटला भेट द्यावी. विचारलेली माहिती भरून योग्य कागदपत्रे अपलोड करावी.
 • नमो शेतकरी महासन्मान योजना 2023 संदर्भातील स्टेटस तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx

या लिंकवर क्लिक करावे आणि अर्ज केला असल्यास तुमच्या नावाचे स्टेटस तपासावे.

 • नमो शेतकरी महासन्मान योजना 2023चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी KYC करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावर करावी त्याशिवाय पुढच्या हत्याचे पैसे किंवा इतर लाभ शासनाकडून मिळवताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात.

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या  विविध योजनांची यादी

भारत सरकार व महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवताना दिसतात. त्यापैकी पुढील काही योजना. या योजनांबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीस भेट देऊ शकता.

 • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
 • पॉली हाऊस सबसिडी योजना
 • नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना
 • राष्ट्रीय कृषी विकास योजना
 • मागेल त्याला विहीर योजना
 • प्रधानमंत्री फसल बिमा योजना
 • प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना
 • सौर कृषि वाहिनी योजना
 • प्रधानमंत्री किसान संपदा योजना
 • पीएम प्रणाम योजना
 • शेतमाल तारण योजना
 • कृषी यांत्रिकीकरण योजना