NAMO Shetkari Maha Sanman Nidhi केंद्रासोबतच राज्य सरकार देखील देणार शेतकऱ्यांना 6,000 रु.

NAMO Shetkari Maha Sanman Nidhi

NAMO Shetkari Maha Sanman Nidhi 2023 ही केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारखीच योजना आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यास महाराष्ट्र शासनाकडून मान्यता

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (NAMO Shetkari Yojana) पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता मिळाली आहे.  त्यासंबंधी शासनाने शासन निर्णय देखील काढला आहे त्याची प्रत पुढील प्रमाणे

NAMO Shetkari Maha Sanman Nidhi
NAMO Shetkari Maha Sanman Nidhi

महाराष्ट्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून प्रतिवर्षी 6 हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये  शेतकऱ्यांना मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प 2023-24 मांडताना यासंबंधी घोषणा केली होती. त्याप्रमाणे आता योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता मिळाली आहे. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत,

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना काय आहे? (What is NAMO Shetkari Maha Sanman Nidhi)

 • नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
 • या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
 • केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
 • केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
 • यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 या योजनेचा लाभ केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे जे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत.
 • तसेच जे शेतकरी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 •  ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत E-KYC ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • ज्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्याचे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे त्यांनाच या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 चा लाभ घेता येणार आहे.
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबाना होणार असल्याचे महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात येत आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे

 • केँद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी असलेले ओळखपत्र
 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • निवास प्रमाण पत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • बँक खात्याची माहिती
 • जमिनीचे दस्तावेज
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • मोबाइल नंबर

शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या या 6000+6000 = 12000 रुपयांची मोठी मदत होणार आहे. वार्षीक 12000 रु. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. हप्त्या हप्त्याने जमा होणारे हे पैसे शेतकऱ्यांच्या नक्की कामी येतील. केंद्र शासनासोबतच राज्य शासनाने देखील शेतकऱ्यांना दिलेला हा मदतीचा हात नक्कीच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवून जाईल.