आता मिळेल गुरे खरेदीसाठी कर्ज Pashu kisan credit Card PDF Application Form

Pashu kisan credit Card PDF Application Form आपल्या महाराष्ट्र राज्यात शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे आपण समजू शकतो की शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस चांगला असेल तर शेतीतून चांगले पीक मिळते तर कधी पाऊस शेतीला पुरक नसेल तर शेतकऱ्यांचे नुकसान होते, अशावेळी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेकऱ्यांना पशु पालनासारखे व्यवसाय करावे आणि त्यातून आपला रोजगार मिळवावा या उद्देशाने शासनाने पशु किसान क्रेडिट कार्ड येजना आखली आहे. ही योजना भारत सरकारकडून २०१९ पासून सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत गाई, म्हशी किंवा शेळी पालनासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

 pashu kisan credit card scheme योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला अर्ज दाखल करायचा असल्यास तो ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येतो., तसेच या योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्याचे दोन प्रकार आहेत ते आपण समजून घेऊ.

kisan credit card loan शेतकऱ्याकडे असलेल्या गुरांवर कर्ज घेणे

 ज्या शेतकऱ्यांना आपल्या गुरांवर कर्ज घ्यायचे आहे, त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो. तुमची गुरे म्हणजे गाय, म्हैस यांच्या संख्येची नोंद, त्यांच्याकडून मिळणारे उत्पन्न म्हणजेच ही गुरे किती उत्पन्न देतात या सर्व बाबींची नोंद अर्ज दाखल करताना शेतकऱ्याला करावी लागते. तसेच एखादे जनावर अजारी असल्यास देखील शासनाकडून शेतकऱ्याला कर्ज मिळत असते.

शेतकऱ्याला गुरे खरेदी करण्यासाठी कर्ज मिळते

एखाद्या शेतकऱ्याकडे गुरे किंवा शेळ्या नसतील तर शासनाकडून पशुपालनासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. कमी व्याजदरात या योजनेंतर्गत जनावरांसाठी कर्ज मिळू शकते. हे कर्ज घेण्याच्या रकमेची मर्यादा आहे त्याबद्दल पुढे जाणून घेऊ.

 • गाय खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून 40,000/-  रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते.
 • म्हैस खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून 60,000/-  रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते.
 • वराह पालन करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून 16,000/-  रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते.
 • मेंढ्या किंवा शेळ्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून 4,000/-  रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते.
 • कोंबड्या खरेदी करण्यासाठी प्रती कोंबडी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून 700/-  रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते. pashu kisan credit card scheme

कोणत्या बँकामधून पशु किसान क्रेडिट कार्डवर कर्ज मिळेल?

      पशु किसान क्रेडिट कार्ड योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याने भारतातील पुढील बँका या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार असतात. kisan credit card interest rate

 • स्टेट बँक ऑफ इंडिया
 • एचडीएफसी बँक
 • बँक ऑफ बडोदा
 • आयसीआयसीआय बँक
 • पंजाब नॅशनल बँक
 • अॅक्सिस बँक

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्जा मिळविण्यासाठी अर्जदाराची पात्रता

 • अर्जदार शेतकरी भारताचा नागरीक असावा
 • शेतजमीन कमी असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करु शकतात.
 • ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही.
 • जे शेतकरी गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करतात.
 • वरील पात्रतेत बसणाऱ्या सर्व शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे

पशु किसान क्रेडिट कार्डयोजने अंतर्गत अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे kisan credit card scheme details

 • शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र
 • पॅनकार्ड
 • आधार कार्ड
 • मतदान ओळखपत्र 

pashu kisan credit card apply online पशु किसान क्रेडिट कार्ड 2023 योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

 • पशु किसास क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्जपद्धती उपलब्ध आहे.
 •  तसेच बँकेत जाऊन या योजनेचे नाव सांगितल्यास शेतकऱ्यांना अर्ज मिळतो तो त्यांनी भरुन द्यावा. आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावीत.
 • केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्डचा वापर अनिवार्य आहे.
 • मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड  ही ओळखपत्रे शेतकऱ्यांनी सोबत ठेवावीत.

पशु क्रेडिट कार्ड योजनेची मुख्य उद्दीष्टे समजून घेऊ

ज्या शेतकऱ्यांकडे शेतीसाठी जमीन कमी आहे किंवा जी जमीन आहे त्यात शेतकऱ्यांना उत्पन्न घेता येत नाही अशा शेतकऱ्यांना पशू खरेदीसाठी शासनाकडून कर्ज दिले जाते. जेणेकरुन किमान पशूपालनातून तरी त्या शेतकऱ्यांना रोजगार मिळवावा हे एकमेव उद्दिष्ट पशु क्रेडिट कार्ड योजना राबवण्यामागे आहे.

तसेच शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत परंतू ती आजारी असतील तर त्यांचा इलाज करण्यालाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसतील तरी देखील पशु क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मिळते. या आणि अशा अनेक योजना अशा आहेत ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक शेतकरी असतील तर तुम्ही या योजना त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी मदत करा. आमचा हा लेख तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता.