Pik vima yojana Maharashtra पीक विमा तुमच्या खात्यात जमा झाला का?

Pik vima yojana Maharashtra

Pik vima yojana Maharashtra भारतात अनेक ठिकाणी पाऊस कमी पडतो, दुष्काळ निर्माण होतो तर काही ठिकाणी पाऊस जास्त पडल्याने देखील शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान होते. अशावेळी शेतकरी हवालदिल होतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी घेतलेले लाखोंचे कर्ज असते. पावसाच्या असा अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज फेडता येत नाही. त्यामुळे विदर्भासारख्या भागात शेतकऱी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांची ही आर्थिक अडचण दूर व्हावी आणि शेतकऱ्यांना एक विश्वसनीय आर्थिक पर्याय प्राप्त व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी त्यांच्या पिकाचा विमा काढून एखाद्या नैसर्गिक हानीमुळे त्यांचे पीक आले नाही तर त्यावर वीमा मिळवू शकतात अशी योजना सुरु केली. ही योजना नेमकी काय आहे आणि यावर्षीचा म्हणजेच 2023 मधील पीक विमा शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यास सुरुवात झाली आहे त्याबद्दल अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Pik vima yojana Maharashtraशेतकरी पीक विमा योजनेची सुरुवात

दि. 13 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ लागू केली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात  शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचं संरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान पीक विमा योजना ही गरीब शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करणार आहे. तसेच या  शेतकऱ्यांच्या कुटुंबात जी आर्थिक अस्थैर्याची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत देखील नक्कीच बदल घडवण्यास कारणीभूत नक्कीच
ठरेल.  कमीत कमी प्रीमियमवर पीक विमा सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी शासनाने विविध विमा कंपन्यांसोबत संलग्न होऊन ही योजना राबवली आहे.

पीक विमा 2023 वाटपास सुरुवात

यावर्षीच्या म्हणजेच 2023 मधील खरीप हंगामामध्ये तब्बल एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरलेला आहे. केवळ 1 रुपया भरुन हा पीक विमा काढयाचा होता.  शासनातर्फे पीक विम्यासाठी 1 कोटी 73 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा काढला होता. त्यानुसार पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पावसाळ्यात ज्या भागात 21 दिवसापेक्षा जास्त काळ पाऊस लागलाच नाही.  अशा ठिकाणी महसूल विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पिक विमा वाटपाच्या अधिसूचना काढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत  पिक विमा जमा झालेला आहे.

पीक विमा योजना कोणासाठी आहे?

 2016 मध्ये जाहीर झालेली पीक विमा योजना ही दुष्काळ ग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आहे. दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशा शेतकऱ्यांनी आधीच शासनाकडे 1 रु. मध्ये त्यांच्या त्यांच्या शेताचा पीक विमा काढावा. त्यातून नेमलेल्या खाजगी कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन पीक विमा देण्यात येणार असे या योजनेत नमूद करण्यात आले.

पीक विमा तुमच्या खात्यात जमा झाले हे कसे ओळखावे?

तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही शेतकरी पीक विमा योजनेनुसार आगाऊ पद्धतीने शासकीय योजनेमार्फत शासनाने ठरवून दिलेल्या विमा कंपनीकडे 1 रु. भरुन तुमच्या पिकाचा विमा काढला असले तर तुमच्या खात्यात यावर्षीचा पीक विमा जमा झाला पाहिजे. तुमच्या खात्याशी संलग्न असलेला तुमच्या मोबाईल नंबरवर त्यासंबंधी मॅसेज येईल. बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर एक मॅसेज प्रत्येक शेतकऱ्याला जातो. तो मॅसेज तुम्हाला देखील येईल.

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर घोषणा केली की, 2023 या वर्षातील शेतकऱ्यांना देण्यात येणारा पीक विमा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पोहोचला आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर हे ते 16 जिल्हे आहेत.