PM Kisan 17th Installment Date 2024: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता या तारखेला मिळणार

PM Kisan Yojana 17th Installment: केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतांना दिसत आहे. पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेला सर्वात यशस्वी योजना म्हणून देखील ओळखले जाते. आपल्याला माहित आहे की या योजनेअंतर्गत वर्षांला तीन टप्प्यांत 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले जातात.

आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 16 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले असून लवकरच 17 वा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता पाठवला जातो. म्हणजेच शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा हातभर लागतो. 

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते मिळाले आहेत. मागील सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वितरित करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी 17व्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. 

आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की, 17‌वा हप्ता कधी जमा होईल. कारण खरीप हंगामाच्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पैसे लागले आहेत आणि आता शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. पेरणीची वेळी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना याच महिन्यात 2 हजार रुपयांचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे.

पीएम किसान योजना 17व्या हप्त्याची तारीख जाहीर
पीएम नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जारी केला आहे. pm kisan yojana 17th installment date या 2000 रुपयांचा लाभ 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. लवकरच 17वा हप्ता 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. 

PM Kisan 17th Installment Date 2024
pm kisan yojana नवीन सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. पीएम नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी मोठा हातभर लागणार आहे. 

फाईलवर स्वाक्षरी करताना पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्ण समर्पित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करताना आमचे सरकार शेतकरी हिताचे बोलत आहे. (pm kisan 17th installment)

पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता या तारखेला येणार
तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पहिली मोठी भेट दिली आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 17व्या हप्त्याचे 2000 रुपये वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी जमा केला जाणार आहे. हा हप्ता पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांच्या 2000 रुपये दिले जाणार आहे. या करिता 20 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अनेक शेतकरी या योजनेपासून पात्र करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकरी पात्र असून सुद्धा अपात्र करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांची e kyc बाकी आहे त्यांना हा हप्ता मिळणार नाही. आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन किंवा आपल्या मोबाईलवरून ई केवायसी करून घ्या.

Namo Shetkari Yojana Next Installment Date तसेच महाराष्ट्र सरकार देखील केंद्र सरकार प्रमाणे वार्षिक 6000 रुपये देत आहे. हा हप्ता देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो. याबाबत सध्या कोणतेही अपडेट आले नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचवू.

pm kisan yojana e kyc शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना पैशाची अडचण असते. अशावेळी जर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत असेल तर नक्कीच मदत होणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांना माहीत व्हावी या करिता ही माहिती शेतकऱ्यांना शेअर नक्की करा.