PM Kisan Yojana योजनेचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे सरकार हप्त्याने देते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये मिळतात. हे पैसे एका वर्षात एकूण 3 हप्त्यांमध्ये दिले जातात.

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना फेब्रुवारी २०१९ पासून आर्थिक मदत केली जात आहे. सुमारे ८.५ कोटी कुटुंबांना आर्थिक मदत मिळते. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या संख्येने कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ताही लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान पीएम किसानचा हफ्ता मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल तर 15 वा हप्ता अडकू शकतो. अनेक शेतकऱ्यांचे चौदाव्या हप्त्याचे पैसे अडकल्याची बातमी आली. अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी E-KYC  केले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हप्त्याची रक्कम अडकली आहे.. सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. त्याशिवाय सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवणार नाही.

 शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे  का आवश्यक आहे?

 प्रधानमंत्री किसान योजनेसाठी ई-केवायसी करवून घेणे हे अजीबातच अवघड काम नाही. तरीही अनेक शेतकऱ्यांनी हे महत्त्वाचे काम पूर्ण केलेले नाही. काही अपात्र नागरिक या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्यामुळे  या योजनेतील फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने  तांत्रीकदृष्ट्या पावले उचलली आहेत. म्हणूनच लाभार्थी शेतकऱ्याला ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. हे काम शेतकरी आपल्या स्मार्टफोनचा वापर करून काही मिनिटांत घरी बसून करू शकतात. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊनही ई-केवायसी करता येते. तुम्ही पीएम किसान पोर्टलवर ओटीपी आधारित ई-केवायसी करु शकता.

ई-केवायसी करा आणि तुमचा अडकलेला हफ्ता मिळवा

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.pmkisan.gov.in.
  • वेब पेजवर  ‘E-kyc’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. त्यानंतर ‘Search’ वर क्लिक करा.
  • तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP मिळेल.
  • ‘Get OTP’ वर क्लिक करा.
  • OTP एंटर करा आणि एंटर दाबा.

अशापद्धतीने तुमची प्रधानमंत्री किसान योजना eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.

शेतकऱ्याचे खाते NPCI शी लिंक असणे आवश्यक

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते देखील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी जोडलेले असावे. खाते लिंक नसेल तर पैसे मिळणे कठीण होऊ शकते.

लाभार्थी शेतकऱ्याची जमीन पडताळणी

जे शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा त्याहून कमी जमीन असावी. शेतकरी हा जमिनीचा मालक असल्याने त्याला पीएम किसान वेबसाइटवर त्याच्या जमिनीची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. जेणेकरून लाभार्थी शेतकरी जमिनीचा मालक असल्याचे सिद्ध करता येईल. कागदपत्रे तपासल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनीची प्रत्यक्ष पडताळणीही करणार आहेत.

पंधानमंत्री किसान सन्मान योजना हेल्पलाईन

सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल. त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 155261 वर कॉल करू शकता. यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळू शकते. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसंदर्भात तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी आजच या हेल्पलाइनवर कॉल करा.