PM Kisan Yojana Update: तब्बल 2.5 लाख शेतकरी PM Kisan योजनेतून वगळले! 21व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल, जाणून घ्या नेमकं कारण

PM Kisan Yojana Update: केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची आर्थिक मदत करणारी योजना आहे. आजवर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात या योजने अंतर्गत 20 हप्ते जमा होऊन त्यांना वेळोवेळी पिकाच्या खर्चासाठी, बियाण्यांसाठी आणि अन्य गरजांसाठी मोठा आधार मिळत आला आहे. पण 21व्या हप्त्यापूर्वी एक धक्कादायक अपडेट (PM Kisan 21st Installment Update) समोर आले असून, या अपडेट अंतर्गत, PM Kisan योजनेतून तब्बल अडीच लाख शेतकरी वगळले गेले असल्याचं बघायला मिळत आहे.

का वगळले गेले इतके शेतकरी?

PM Kisan योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला मिळू शकतो, हा नियम खूप आधीपासून लागू आहे. पण या योजनेत यापूर्वी अनेक कुटुंबांतील पती व पत्नी अशा दोघांनीही स्वतंत्र नोंदणी केली होती. काहींच्या कुटुंबात दोघांच्याही नावावर जमीन असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे हप्ते सुरू होते. यामुळे सरकारने लाभार्थी संख्या पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला.

केंद्र सरकारने आता आधार, उत्पन्नकर विभाग (Income Tax Portal) आणि शिधापत्रिका पोर्टल (Ration Card Database) यांचा वापर करून एका कुटुंबातील किती सदस्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे, कोणाचे उत्पन्न किती आहे आणि कोण खरोखर पात्र आहे याची मोठी पडताळणी सुरू केली असून, या तपासणीत असे समोर आले की अनेक कुटुंबांत पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळत होता. नवीन नियमानुसार, जर दोघांच्याही नावे जमीन असेल, तर पतीचा हप्ता बंद करून पत्नीचा हप्ता सुरू ठेवण्यात येणार आहे.

याच सुधारणेमुळे 21व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असून, तब्बल 2.5 (PM Kisan 2.5 Lakh Farmers Removed) लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

21व्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र राहिले?

  • 2 ऑगस्ट रोजी 20वा हप्ता मिळालेले शेतकरी: 91,91,000
  • 21व्या हप्त्यासाठी पात्र असलेले शेतकरी: 20,41,241

यामध्ये 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांची घट झाली आहे, जो शेतकरी समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या बदलांमुळे काही कुटुंबांचा हप्ता थांबणार असल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत, तर काहीजण योग्य लाभार्थ्यांनाच पैसा मिळाला पाहिजे अशा भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे.

21वा हप्ता कधी मिळणार?

पूर्ण देशातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेला PM Kisan चा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार होता. हा हप्ता मिळण्यापूर्वीच लाभार्थी यादीतील बदल समोर आल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

ही सुधारणा शेतकऱ्यांच्या हिताची का आहे?

याबाबत सरकारचा म्हणणं असं आहे की:     

  • फक्त योग्य लाभार्थ्यांनाच या पैशाचा लाभ मिळावा
  • कुटुंबातील एकाच व्यक्तीला हप्ता देऊन दुबार लाभ बंद करणे
  • योजनेची पारदर्शकता आणि प्रामाणिकता वाढवणे
  • शासनाची आर्थिक तरतूद ज्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे

पण वास्तविक बघता, ज्या कुटुंबांत दोन्ही सदस्य शेतीत सक्रिय आहेत, तिथे पतीचा हप्ता बंद होणे ही काही प्रमाणात खंत (PM Kisan Family Rule Update) व्यक्त करण्यासारखी बाब आहे.

शेतकऱ्यांनी (PM Kisan Eligibility Check 2025) काय करावे?

जर तुमचा हप्ता थांबला असेल किंवा तुम्ही पात्र असूनही योजनेतून वगळले (PM Kisan Beneficiary List Correction) गेले असाल, तर तुमचे आधार-लिंकिंग, KYC, जमिनीचे कागद, बँक खाते, आणि E-KYC स्थिती ही सर्व माहिती PM Kisan पोर्टलवर तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.