PM Kisan Yojana Update: PM Kisan योजनेत मोठा बदल, आता 6,000 नाही, थेट 9,000 रुपये मिळणार? बघा संपूर्ण बातमी

PM Kisan Yojana Update: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे डोळे नेहमीच सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आशेने बघत असतात. कारण महागाईने अक्षरशः जगणे कठीण केले आहे. खतांच्या, बियाण्यांच्या, कीटकनाशकांच्या आणि डिझेलच्या भाववाढीमुळे शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत जातो आहे. अशा वेळी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana Latest News) ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आधारवडासारखी योजना ठरते. दरवर्षी मिळणारे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तात्पुरता आधार तर देतातच, पण त्याचबरोबर सरकारकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे शेतकरी वर्गाला खूप जास्त मदत होते.

आता मात्र या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणखी मोठे हास्य फुलवणारी बातमी समोर आली आहे. विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की PM Kisan Yojana अंतर्गत मिळणारा सन्मान निधी 6,000 रुपयांवरून वाढवून थेट 9,000 रुपये (PM Kisan 9000 Rupees News) करण्यात येऊ शकतो. म्हणजेच दर हप्त्यात मिळणारे 2,000 रुपये आता 3,000 रुपये होऊ शकतात. हा बदल झाला तर लहान-मोठ्या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यात शंकाच नाही, कारण महागाईच्या काळात हा आर्थिक हातभार अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

शेतकऱ्यांची अपेक्षा वाढतेय, सरकारचा प्लॅन नेमका काय?

PM Kisan Yojana सुरू झाल्यापासून सरकार दरवर्षी 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण गेल्या काही वर्षांत शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच बाबींचे दर प्रचंड वाढले आहेत. वाढत्या खर्चाच्या तुलनेत सन्मान निधीची रक्कम मात्र अनेक वर्षांपासून बदललेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून ही रक्कम वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे.

सरकारची आगामी अर्थसंकल्पाबद्दल (Kisan Samman Nidhi New Payment) चर्चा सुरू आहे, आणि सूत्रांच्या माहितीनुसार सरकार या वेळी काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर हा निर्णय लागू झाला, तर शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणारी 6,000 रुपयांची मदत थेट 9,000 रुपये किंवा कदाचित त्याहूनही अधिक होऊ शकते.

अर्थसंकल्पाची तयारी, यावेळी काहीतरी वेगळं होणार का?

1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची तयारी सरकार अनेक महिन्यांपूर्वीपासून सुरू करते. यात NITI Aayog, विविध मंत्रालये, तज्ज्ञ, कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि राज्य सरकारांकडून महत्त्वाचे प्रस्ताव घेतले जातात. संविधानाच्या अनुच्छेद 112 नुसार तयार होणाऱ्या या Annual Financial Statement मध्ये येत्या वर्षात सरकार कोणत्या क्षेत्रावर किती खर्च करणार हे निश्चित केलं जातं. यावर्षी अर्थसंकल्पाची तयारी थोडी अधिक सखोल पद्धतीने केली जात असल्याचे सांगितल जात आहे, आणि याच कारणामुळे कृषी क्षेत्रासाठी काही सकारात्मक घोषणा (PM Kisan Budget Announcement) होण्याची शक्यता आणखी वाढताना बघायला मिळते.

विविध प्रतिनिधींनी सरकारकडे अनेक सूचना दिल्या आहेत, त्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे PM Kisan Saman Nidhi Scheme ची रक्कम वाढवणे याबाबत आहे. शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल मोठा उत्साह आहे, कारण हप्त्याची रक्कम जर 9,000 रुपये (PM Kisan Installment Increase) झाली तर शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांच नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, तसेचब्यांना कुटुंबाचा खर्च आणि शेतीची गुंतवणूक यामध्ये समन्वय साधण्यास मदतच होईल.

शेतकऱ्यांसाठी का विशेष आहे ही वाढ?

  • हप्त्यातील या वाढीमुळे खत व बियाण्यांच्या होणाऱ्या  दरवाढीत ही मदत महत्त्वाची ठरू शकते.
  • शेतकऱ्यांना कुटुंबाच्या दैनंदिन खर्चात थोडा दिलासा मिळणार आहे.
  • तसेच या योजनेचा लहान भूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे.