Police Recruitment 2024: सप्टेंबर 2024 मध्ये सात हजारांहून अधिक कर्मचारी मुंबई पोलीस दलाच्या सेवेत रुजू होणार

Police Recruitment 2024

Police Recruitment 2024 महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था म्हणजे महराष्ट्र पोलीस दल. महाराष्ट्र पोलीस दल हे भारतातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून या दलामध्ये 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे 1,80,000 इतके आहे. महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात मोठी भरती करण्यात आली होती. आणि भरती अंतर्गत आता तब्बल 8 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते लवकरच कामाच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. Police Recruitment 2024

महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकावेळी 8 हजार पोलिसांचे प्रशिक्षण

राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतच्या तब्बल आठ हजार पोलिसांचे प्रशिक्षण 31 ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यातील सात हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी मुंबईतील असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात ते मुंबई पोलीस दलात सामील होणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या संख्याबळाचा प्रश्न बहुतांशी सुटणार आहे.

कोरोनानंतर 3 वर्ष पोलीस भरती थांबली होती

करोनाकाळात लॉकडाऊननंतर तब्बल तीन वर्ष पोलीस भरती झालीच नव्हती. तसेच 2022 मध्ये मध्ये मिरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड ही दोन आयुक्तालये वाढल्यामुळे राज्य पोलीस दलात 18 हजार 331 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक म्हणजे सुमारे 8,076 पदांसाठी भरतीची जाहिरात करण्यात आली. या जाहिरातीला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील तरुण तरुणींनी सात लाखांहून जास्त अर्ज  सादर केले होते. गेल्यावर्षी झालेल्या या भरती प्रक्रियेत तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक उमेदवार मैदानी चाचणीत यशस्वी झाले होते. त्यानंतर लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या सर्वांना प्रशिक्षणासाठी राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांत पाठवण्यात आले होते, आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांचे प्रशिक्षण होऊन सर्व तरुण सप्टेंबर महिन्यात मुंबई पोलीस दलात दाखल होणार आहेत. Police Recruitment 2024

10 प्रशिक्षण केंद्रांवरुन

राज्यातील मरोळ, खंडाळा, दौंड, सांगली, सोलापूर, लातूर, जालना, धुळे, अकोला व नागपूर या 10 प्रशिक्षण केंद्रांवर सुमारे आठ हजारांहून अधिक नव्याने भरती झालेल्या पोलिसांचे प्रशिक्षण सुरू असून ३१ ऑगस्टला ते संपणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 10 प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण सुरु असलेल्या तब्बल 8000 पोलीस उमेदवारांचे प्रशिक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे सात हजारांहून अधिक पोलीस मुंबई पोलीस दलातील आहेत असे सांगण्यात येत आहे.

कुठे आणि किती जणांना पोलीस प्रशिक्षण ?

  • मरोळ येथील प्रशिक्षण केंद्रात  500 प्रशिक्षणार्थिंना  पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • दौंड येथील नाणवीज प्रशिक्षण केंद्रात 800 प्रशिक्षणार्थिंना पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • सोलापूर येथील प्रशिक्षण केंद्रात 1200 प्रशिक्षणार्थिंना पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • जालना येथील प्रशिक्षण केंद्रात 1200 प्रशिक्षणार्थिंना  पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रात 1200 प्रशिक्षणार्थिंना पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • खंडाळा येथील प्रशिक्षण केंद्रात 600 प्रशिक्षणार्थिंना पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  •  सांगली येथील तुरची येथील प्रशिक्षण केंद्रआत 600 प्रशिक्षणार्थिंना पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • लातूर येथील भूळगाव येथील प्रशिक्षण केंद्रात 900 प्रशिक्षणार्थिंना  पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात 600 प्रशिक्षणार्थिंना पोलीस प्रशिक्षण देण्यात आले
  • अकोला येथील प्रशिक्षण केंद्रात 800 प्रशिक्षणार्थिंना पोलीस प्रशिक्षण देण्यात आले. Police Recruitment 2024

अपुऱ्या संख्याबळाचा सुटणार प्रश्न

महाराष्ट्रात नेहमीच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची गरज असते. त्यातही मुंबई हे असे शहर आहे जीथे जास्तीत जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी गरज असते. गणेशोत्सव, दिवाळी, मोहरम  आणि इतर सरणांसाठी पोलीस कर्मचारी बंदोब्त करीत असतात. त्यामुळे सुव्यवस्थीतपणे सर्व कामे होत असतात. असे असताना गेली तीन वर्षे   पोलीस संख्याबळाचा प्रश्न सतत भेडसावत होता. परंतु आता या भरतीमुळे हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या भरतीमध्ये  पोलीस शिपाई व पोलीस चालक या पदांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. Police Recruitment 2024