Power SIP: पॉवर एसआयपी म्हणजे नक्की काय? सामान्य SIP पेक्षा बेस्ट पर्याय

SIP full form

SIP चा full from आहे Systematic Investment Plan याचा मराठी अर्थ असा होतो की, पद्धतशीर गुंतवणूक योजना.

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजेच Systematic Investment Plan ही एक गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. जिथे आपण एक ठराविक रक्कम ठराविक दिवशी आपल्या गुंतवणूकीला जोडली जाते, उदा. आपल्याकडे 24,000रु. आहेत. एक तर हे सगळे पैसे सरसकट  एखाद्या  म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो  किंवा तेच 24,000रु. आपण महिनाकाठी 2,000रु अशा पद्धतीने एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती होईल SIP(Systematic Investment Plan) म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना.

SIP calculator

      आपण गुंतवलेली किंवा बचत केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज त्यातून आपल्याला मिळणारा परतावा या सगळ्याचे गणित तुम्ही एका क्षणात मांडू शकता.  दरमहा तुम्हाला किती रक्कमेची बचत करायची आहे हा आकडा ठरवा त्यानंतर,  SIP चा investment rate म्हणजेच तुमच्या बचतीवरील व्याजाचा आकडा समोर येईल आणि 1, 5  किंवा 10 असे किती वर्षांसाठी तुम्ही ही गुंवणूक करणार आहात ते निवडा. अगदी 1 सेकंदात तुम्हाला तुम्ही करु इच्छित असलेली गुंतवणूक त्यावरील व्याज आणि तुम्हाला मिळणारी रक्कम याचा पुर्ण तपशील तुमच्या समोर येतो. यालाच SIP calculator  असे म्हटले जाते.

 https://groww.in/calculators/sip-calculator तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमच्या SIP गुंतवणूकीचा अंदाज मांडू शकता.

SIP मधील कर सूट

SIP मध्ये गुंतवणूक करताना गुंतवलेल्या किंवा काढलेल्या रकमेवर कोणताही कर लागत नाही. परंतु कर सूट देणाऱ्या योजनांना 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. त्यात गुंतवणूक करून तुम्ही कर सूट मिळवू शकता.

SIP मधील गुंतवणूकीचे फायदे – Benefits of SIP investment

SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे विविध फायदे सांगण्यात येतात परंतु आपण नेमके फायदे अभ्यासणार आहोत,

  • छोट्या गुंतवणूकीतू दिर्घकाळानंतर मोठी रक्कम प्राप्त होते.
  • SIPचा कालावधी संपल्यानंतर हातात येणाऱ्या रकमेवर करात सुट मिळते.
  • या गुंतवणूकीत जोखीम कमी असते.
  • ही एक व्यवस्थित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक आहे.
  • SIP मधून पैसे काढण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.
  • यामुळे आपल्याला बचत करण्याची सवय लागते. दरमहिना आपल्या खात्यातून SIPचे पैसे वजा होतात आणि ती रक्कम  आपल्या नकळत बचत केली जाते.

What is Power SIP

      SIP म्हणजेच Systematic Investment Plan हे आपण समजून घेतले. SIPचे फायदे असले तरी या गुंतवणूकीचे काही तोटे देखील पाहायला मिळतात. आपण SIP ची रक्कम ठरवली की, दर महिन्याला ती रक्कम आपल्या खात्यातून वजा होते आणि इक्विटी मार्केटमध्ये गुंतवली जाते. त्यावेळी बाजाराचे मूल्यांकन नक्की कसे आहे ते पाहिले जातेच असे नाही. म्हणजे बाजारात मंदी आहे की गती आहे याचा अंदाज घेतला जात नाही.  बाजार  मोठ्या घसरणीनंतर खूप खाली आला असेल, तरीही गुंतवणूकीची रक्कम तशीच राहते, संधीचा फायदा घेण्यासाठी त्यात कोणतीही वाढ केली जात नाही. बाजारातील नियमित गुंतवणुकीद्वारे सरासरीचा फायदा घ्यायचा असेल, तसेच बाजारातील पडझडीच्या वेळी अधिक गुंतवणुकीचा फायदा घ्यायचा असेल तर काय करावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे  Power SIP.

Power SIP ही एक अशी SIP योजना आहे, ज्यामध्ये नियमित गुंतवणुकीसोबतच बाजारातील चढ-उताराचा फायदा घेण्यासाठी एक धोरण आखले जाते. Mahindra Manulife Mutual Fund, Funds India, Edelweiss आणि अशाच अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या पॉवर SIP योजना आणल्या आहेत.

Power SIP योजना कशापद्धतीने काम करते? How to works Power SIP

आपण एक उदाहरण पाहू,  तुम्ही SIP मध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवायचे ठरवले. आता जर तुम्ही ही गुंतवणूक Power SIPद्वारे केली असेल, तर प्रत्येक हप्ता बाजारात ठेवण्यापूर्वी मूल्यांकन मॉडेलद्वारे ठरवले जाईल की तुमची रक्कम इक्विटी आणि डेटमध्ये किती प्रमाणात विभागली गेली पाहिजे.

Power SIP मुळे एक गोष्ट सामान्यांसाठी चांगली झाली आहे की, बाजारातील चढ-उतारानुसार दर महिन्याला गुंतवणूक धोरण बदलण्यासाठी सामान्य व्यक्तीला काहीही करावे लागणार नाही. SIP अंतर्गत निधी व्यवस्थापक याबाबतची धोरणे बाजाराप्रमाणे निश्चित करतात आणि केवळ सामान्य व्यक्तीला महिन्याला ठराविक SIP ची गुंतवणूक करावी लागेल.