रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे तिकिट तपासण्यासाठी TC ची नेमणूक केलेली असते. हे TC विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून योग्य ती कारवाई करण्यासाठी असतात. भारतीय रेल्वेचे जाळे भारताच्या सर्वच राज्यांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या प्रत्येक भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही राज्यात नोकरीची संधी मिळू शकते. यावेळी 10 वी 12 वी पास तरुणांसाठी सुवर्ण संधी रेल्वे बोर्डाने जाहीर केली आहे.
भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 1255 पदांसाठी तिकिट कलेक्टर पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करण्यास इच्छूक असाल तर आम्ही तुमच्यासाठी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. Railway Bharti 2024
अर्जदाराची वयोमर्यादा
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे ते 38 वर्षे आहे.
- ओबीसी, एससी, एसटी या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड
- 10/12 वी चे उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र
आवश्यक पात्रता
भारतीय रेल्वे अंतर्गत जाहीर झालेल्या तिकिट कलेक्टर पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या प्रत्येक अर्जदाराने पुढील पात्रता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार 10 वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा.
- अर्जदार आरक्षित प्रवर्गातील असल्यास सर्व कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
- अर्जदार विकलांग असल्यास संबंधिक कागदपत्रे आणि ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. Railway Bharti 2024
भरती प्रक्रिया कशी असेल?
भारतीय रेल्वे अंतर्गत TC म्हणजेच टिकिट कलेक्टर पदासाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची प्रक्रिया पुढील प्रमाणे असणार आहे.
लेखी परीक्षा – अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सर्वप्रथम रेल्वे बोर्डाची लेखी परीक्षा पास करावी लागेल. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी निवडले जाणार आहेत.
मुलाखत – लेखी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेले उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील. मुलाखत त्या त्या राज्यांमधील भाषांमध्ये घेतली जाईल. मुलाखतीत उत्तम गुण मिळवणारे उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी निवड केली जाते.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी – मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची महत्त्वाची आणि शेवटची निवड चाचणी म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी. या चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराने नोकरीवर रुजू होणे अपेक्षित असते. Railway Bharti 2024
परिक्षा शुल्क किती असेल
भारतीय रेल्वे अंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदारांना 500 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 250 रुपये शुल्क भरावा लागणार आहे.
मासिक वेतन किती असेल?
भारतीय रेल्वे टिसी म्हणजेच ticket collector या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यास मासिक वेतन 25,000 ते 35,000/- इतके मिळणार आहे. सोबत केंद्र शासनातील सेवेचे इतर भत्ते देखील जोडण्यात येणार आहेत. Railway Bharti 2024
येथे अर्ज करा
भारतीय रेल्वेअंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या TC पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. https://indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही भारतीय रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचू शकता, तेथे तुम्ही तुमच्या शहराची निवड करा. त्यासाठी रिक्रृटमेंट टॅबवर जा. https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281 या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही तुमच्या शहरातील भारतीय रेल्वे विभागाच्या स्वतंत्र वेबसाईटला भेट देऊ शकता आणि पदभरतीसाठी अर्ज करु शकता. Railway Bharti 2024