
Ration Card eKYC Online रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आता बंधनकारक झाले आहे. जर ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर रेशनवर मिळणारे धान्य बंद होऊ शकते. तसेच कुटुंबातील सदस्यांची नावे रेशन कार्डमधून वगळली जाण्याची शक्यता आहे.
म्हणूनच वेळ न दवडता सर्वांनी आपली ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. चांगली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून करू शकता.
रेशन कार्ड ई-केवायसीसाठी काय आवश्यक आहे? Ration Card eKYC Online
ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर आधी तो लिंक करून घ्या. कारण ओटीपी आधारला लिंक असलेल्या नंबरवरच येतो.
मोबाईलवरून ई-केवायसी कशी करायची?
सर्वप्रथम मोबाईलमध्ये Play Store उघडा.
Play Store मध्ये Mera KYC असे सर्च करा.
हे अॅप इंस्टॉल करा.
यानंतर पुन्हा Play Store मध्ये जाऊन Aadhaar Face RD असे सर्च करा.
हे दुसरे अॅपही इंस्टॉल करून घ्या.
ही दोन्ही अॅप्स आवश्यक आहेत.
Mera KYC अॅपमध्ये प्रक्रिया
Mera KYC अॅप ओपन करा.
अॅपला आवश्यक परमिशन्स द्या.
राज्य निवडताना Maharashtra निवडा.
लोकेशन व्हेरिफाय करा.
यानंतर ज्या व्यक्तीची ई-केवायसी करायची आहे, त्यांचा आधार नंबर टाका.
Generate OTP वर क्लिक करा.
आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल.
ओटीपी आणि कॅप्चा टाकून Submit OTP करा.
Face e-KYC प्रक्रिया
ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल.
आता Face e-KYC या पर्यायावर क्लिक करा.
Aadhaar Face RD अॅप ओपन होईल.
कॅमेऱ्यासमोर चेहरा नीट घ्या.
डोळे उघडे ठेवा.
थोड्याच वेळात फेस स्कॅन होईल.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर e-KYC Successfully Completed असा मेसेज दिसेल.
ई-केवायसी झाली आहे का, ते कसे तपासायचे?
पुन्हा Mera KYC अॅपमध्ये जा.
राज्य – Maharashtra निवडा.
आधार नंबर टाका.
ओटीपी जनरेट करून सबमिट करा.
त्यानंतर e-KYC Status मध्ये Yes असे दिसल्यास तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे.
महत्त्वाची सूचना
रेशन कार्डमधील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी स्वतंत्रपणे करणे आवश्यक आहे.
जर कोणाच्याही ई-केवायसी अपूर्ण राहिली, तर त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डमधून वगळले जाऊ शकते.
म्हणूनच वेळ फार कमी आहे.
आजच मोबाईलवरून ई-केवायसी करा आणि रेशनचा लाभ सुरू ठेवा.