SBI Bank PO Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, भारतातील लाखो तरुणांसाठी सरकारी नोकरीचं स्वप्न हे फक्त सुरक्षित भविष्यासाठीच नाही, तर समाजात एक मानाचं स्थान मिळवण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचं असतं. विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सारख्या प्रतिष्ठित बँकेत नोकरी मिळणं म्हणजे अनेकांसाठी आयुष्यात मिळालेली एक सुवर्णसंधीच ठरते. आता अनेक तरुणांचं हे स्वप्न सत्यात उतरणार आहे, कारण स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे आता मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल आणि चांगल्या करिअरच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.
उपलब्ध पदांची माहिती आणि आरक्षण
- एकूण पदे: 541
- पद: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
- आरक्षण:
- अनुसूचित जाती (SC): 75
- अनुसूचित जमाती (ST): 37
- इतर मागासवर्गीय (OBC): 135
- आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS): 50
- खुला प्रवर्ग: 203
- दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव: 20 (LD-5, VI-5, HI-5, D & E-5)
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
- उमेदवाराने ३ सप्टेंबर २०२५ पर्यंत कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.
- उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असायला पाहिजे आणि त्याचा जन्म २ एप्रिल १९९५ ते १ एप्रिल २००४ दरम्यान झालेला असावा.
- तसेच अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग व महिला उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
वेतनश्रेणी
- प्रारंभिक मूळ वेतन हे ₹48,480 पासून सुरू होऊन ₹85,920 पर्यंत जाईल.
- मूळ वेतन (अगाऊ वेतनवाढीसह): ₹56,480 इतके असेल
- यानुसार अंदाजे वार्षिक CTC हा ₹20.43 लाख असेल.
निवड प्रक्रिया (तीन टप्प्यांमध्ये)
फेज 1: ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा (जुलै/ऑगस्ट 2025)
- स्वरूप: ऑब्जेक्टिव्ह टाईप
- प्रश्न: 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातील.
- वेळ: 60 मिनिटे
विभाग:
- इंग्रजी भाषा (30 प्रश्न)
- क्वांटिटेटिव अॅप्टिट्यूड (35 प्रश्न)
- रिझनिंग अबिलिटी (35 प्रश्न)
- प्रत्येक विभागासाठी 20 मिनिटे वेळ.
- नेगेटिव मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील.
फेज 2: मुख्य परीक्षा (सप्टेंबर 2025)
भाग (1): ऑब्जेक्टिव्ह टाईप: 200 गुण / 170 प्रश्न / 3 तास
- रिझनिंग आणि कॉम्प्युटर अप्टिट्यूड: 40 प्रश्न (60 गुण आणि वेळ 50 मिनिटे)
- डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन: 30 प्रश्न (60 गुण आणि वेळ 45 मिनिटे)
- जनरल अवेअरनेस / इकॉनॉमी / बँकिंग: 50 प्रश्न (60 गुण आणि वेळ 45 मिनिटे)
- इंग्रजी भाषा: 50 प्रश्न (30 गुण आणि वेळ 40 मिनिटे)
भाग (2): डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट: 50 गुण आणि वेळ 30 मिनिटे:
- ही टेस्ट ई-मेल्स, रिपोर्ट्स, सिच्युएशन अनालिसिस, सारांश लेखन यावर आधारित असेल.
फेज 3: सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखत (ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025)
- सायकोमेट्रिक टेस्ट: ही टेस्ट Personality profiling साठी घेण्यात येईल.
- ग्रुप एक्सरसाईज आणि मुलाखत: एकूण 50 गुण (ग्रुप एक्सरसाईज: 20 गुण, मुलाखत: 30 गुण)
अंतिम निवड कशी होते?
मुख्य परीक्षा (फेज-२) मध्ये मिळालेल्या २५० गुणांचं ७५ गुणांमध्ये रूपांतर केलं जातं आणि फेज-३ (सायकोमेट्रिक + इंटरव्ह्यू) मध्ये मिळालेल्या ५० गुणांचं २५ गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. यानंतर हे रूपांतरित एकूण १०० गुण गृहीत धरून अंतिम निवड यादी तयार केली जाते.
अर्ज कसा कराल?
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या: https://bank.sbi/web/careers/current-openings
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १४ जुलै २०२५
- अधिक माहिती आणि तांत्रिक अडचणीसाठी खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर किंवा ईमेल वर संपर्क करा:
- संपर्क: ०२२-२२८२०४२७
- ईमेल: suhaspatil237@gmail.com