SBI Personal Loan: घरबसल्या SBI मार्फत तब्बल 35 लाख रुपयांचे कर्ज मिळवा; असा करा अर्ज

SBI Personal Loan: स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. अनेक ग्राहक विश्वासाने SBI सोबत आर्थिक व्यवहार करणे पसंत करतात. कारण ही बँक नेहमीच तिच्या ग्राहकांसाठी नवनवीन बचत योजना राबवत असते. इतकेच काय सध्या म्युच्युअल फंड्समध्ये देखील गुंतवताना अनेक ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियामधील एसआयपीचा पर्याय निवडताना दिसून येतात. ग्राहकांचा विश्वास जपणारी ही बँक आता कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय  1 त 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज उपल्बध करुन देत आहे. हे कर्ज तुम्ही घरबसल्या बँकेच्या योनो ॲपच्या मदतीने मिळवू शकणार आहात. चला तर मग अधिक माहिती मिळवूया.

SBI SBI Personal Loan मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता.

SBI चे वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी अर्जदाराची आवश्यक पात्रता जाणून घ्या, त्याशिवाय तुम्ही या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करु शकणार नाही.

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदारास किमान मासिक वेतन 15000रुपये असावे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केलेले असावे.

SBI Personal Loan Document कागदपत्र

  • अर्जदाराचे पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र
  • रेशनकार्ड, लाईट बिल (रहिवासाचा पत्ता)
  • ज्या बँकेत पगार जमा होतो त्या बँकेचे 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
  • व्यवसाय करीत असेलल्या व्यक्तींसाठी मागील 2 वर्षांचा ITR सोबतच बँक खात्याचे मागील 6 महिन्यांचे स्टेटमेंट.

घरबसल्या असा करा अर्ज

  • तुमच्या मोबाईलमध्ये SBI चे अधिकृत YONO ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
  • YONO ॲपमध्ये तुमचा मोबाईलनंबर टाकून OTP च्या मदतीने लॉगिन करा.
  • YONO ॲप ओपन झाल्यावर स्क्रिनच्या वरच्या  बाजूस डाव्या कोपऱ्यात वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल.
  • तुम्ही नोकरदार असाल किंवा व्यवसायिक असाल आणि तुमचे खाते आधीपासूनच SBI मध्ये असेल तर तुम्ही याच बँकेकडून पूर्व-मंजूर कर्ज ऑफरसाठी पात्र होऊ शकता.
  • त्यानंतर तुम्हाला गरज असलेल्या कर्जाची रक्कम निवडा आणि परतफेडीचा कालावधी निवडा.
  • एसबीआयमध्ये तुमचे पगार खाते नसल्यास तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि कामाचे तपशील भरुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. .
  • त्यानंतर तुम्हाला गरज असलेल्या कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडा.
  • इतर माहिती भरा आणि तुम्ही कर्ज करारावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी करू शकता आणि पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
  • SBI मधून सबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील, सर्व कागदपत्रे योग्य असतील तर कर्ज मंजूरीसाठी पुढे पाठविला जाईल. SBI Personal Loan

व्याजदर आणि कर्जाचा कालावधी

  • एक वर्षासाठी 1 लाखाचे कर्ज घेतल्यास 8806 रुपये EMI भरावा लागेल. आणि 10.30% व्याज दर असेल.
  • दोन वर्षांसाठी 1 लाखाचे कर्ज घेतल्यास 4647 रुपये EMI भरावा लागेल.  या रकमेवर 10.70% व्याज दर असेल.
  • तीन वर्षांसाठी 1 लाखाचे कर्ज घेतल्यास 3298 रुपये EMI भरावा लागेल. या रकमेवर 11.50% व्याज दर असेल.
  • चार वर्षांसाठी 1 लाखाचे कर्ज घेतल्यास 2663 रुपये EMI भरावा लागेल. या रकमेवर 12.60% व्याज दर असेल.
  • पाच वर्षांसाठी 1 लाखाचे कर्ज घेतल्यास 2150 रुपये EMI भरावा लागेल. या रकमेवर 15.56% व्याज दर असेल.

SBI बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचे फायदे

स्टेट बँकेकडून वैयक्तिक कर्ज हे कर्ज मिळविण्यासाठी ग्राहकांना बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण या वैयक्तिक कर्जाचे फायदे जाणून घेऊ.

  •  कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मंजूरी
  • घरबसल्या मोबाईलवरुन कर्ज प्राप्त करुन घेण्याची उत्तम संधी.
  • कमी इएमआय भरुन वैयक्तिक कर्जाची सोय उपलब्ध
  • प्रोसेसिंग शुल्काचे अतिरिक्त पैसे भरण्याची गरज नाही.

असे एक नाही अनेक फायदे आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामधून वैयक्तिक कर्ज मिळविण्याचे. ठरवलेल्या कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास प्रोसेसिंग फी 3 टक्क्याने कमी केली जाते. ही सर्वसामान्यांसाठी अत्यंत उत्तम बाब आहे. SBI Personal Loan