SIM Card Check Online दुसरा कोणी तुमच्या नावावर सीमकार्ड तर वापरत नाही ना? अशा प्रकारे करा चेक?

SIM Card Check Online

SIM Card Check Online भारत हा आपला देश असा आहे जिथे तंत्रज्ञान तर विकसीत आहेत परंतु मोबाईल्सचा वापरकर्ता म्हणून जगात भारताचा 3 रा क्रमांक लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतातील लोकसंख्या मोबाईल्स आणि सीमकार्डचा वापर करतात. अशा वेळी सीमकार्ड चे फ्रॉड होणे अगदी सहज शक्य आहे. म्हणूनच भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल  सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, हे बघू शकता. कारण तुमच्या नावावर कोणी दुसरीच व्यक्त सीमकार्ड तर वापरत नाही ना याबद्दल सध्या चाणाक्षपणे खबरदार राहणेच योग्य आहे. कारण सध्या फोन नंबरच्या माध्यमातून अनेक  फ्रॉड होत आहेत.

 दुसऱ्याच्या ओळखपत्रावर सीमकार्ड खरेदी करुन पैशांचा फ्रॉड करणे यासारख्य़ा अनेक घटना सध्या शहरी भागात होताना दिसून येतात. आणि आता हे फ्रॉडचे वारे ग्रामिण भागातही पोहोचायला लागते आहेत. म्हणूनच प्रत्येकाने वेळोवेळी हे तपासून पाहिले पाहिजे की त्यांच्या नावार किती आणि कोणत्या नंबरचे  माबोईल सीमकार्ड आहेत. यातील तुम्ही स्वतः किती सीमकार्ड वापरत आहात आणि किती असे सीमकार्ड आहेत जे तुमच्या नावावर आहे परंतु तुम्ही कधीच त्या नंबरचा वापर केला नाही, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला  सीमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फ्रॉडबद्दल जागृत करण्यासाठी आम्ही हा लेक घेऊन आलो आहोत.

यासाठी तुम्हाला या https://www.sancharsaathi.gov.in/ लिंकला भेट द्यावी लागेल. जर तुमच्या बनावटी ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी सिम कार्ड वापरत असेल, तर तो नंबर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक करू शकतात. एका ओळखपत्राच्या आधारे तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकतात.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? हे तपासण्यासाठी खालील प्रकिया करा, TAFCOP या पोर्टलला भेट द्या.

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.sancharsaathi.gov.in/ ही लिंक ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून OTP रिक्वेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • OTP मिळाल्यानंतर तुम्हाला validate ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • समोर तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि सक्रिय मोबाईल नंबरची यादी दिसेल.
  • दिसत असलेल्या यादीमध्ये तुम्ही सध्या वापरत असलेले मोबाईल नंबर तपासून पाहू शकता.

जे नंबर तुम्ही कधीच खरेदी केले नाहीत किंवा वापरले नाहीत असे नंबर देखील समोर दिसत असलेल्या यादीत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे हे समजून जा. मग नक्कीच कोणीतरी तुमची बनावट कागदपत्रे वापरुन तुमच्या नावावर मोबाईल नंबर वापरत आहे हे नक्की. मग अशावेळी घाबरुन न जाता पुढील प्रोसेस करा. आणि जे नंबर तुमच्या ओळखपत्रासमोर दिसत आहेत असे सगळे फोन नंबरचे सीमकार्ड बंद करा.

 तुम्ही वापरत नसलेले सीमकार्ड बंद करण्याची पद्धती

  • तुम्हाला जर सिमकार्ड बंद करायचे असेल तर बॉक्समध्ये तुमचे नाव टाका, त्यानंतर खाली  Report  या बटणावर क्लिक करा.
  • Report ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिसेल. त्यामुळे कुठेतरी संदर्भ क्रमांक लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा फोटो काढा.
  • काही दिवसांनंतर, तुम्ही केलेल्या अहवालाचे तपशील पाहण्यासाठी, https://www.sancharsaathi.gov.in/  वेबसाईटवर लॉगिन करा.
  • यावेळी तुम्हाला तुमचा रिपोर्ट ट्रॅक करण्यासाठी तुमचा Ticket ID Ref No. वरती असलेल्या बॉक्समध्ये टाका.
  • नंतर तुमच्यासमोर तुमच्या रिपोर्टचा स्टेटस उघडेल. तर अशाप्रकारे न वापरलेले सिमकार्ड, तुम्ही न घेतलेले  सिमकार्ड या पोर्टलच्या माध्यमातून बंद करु शकता. तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे सुद्धा  येथे समजू शकेल.

बदलती टेक्ऩॉलॉजी जितकी मानवाच्या मदतीसाठी आहे तितकेच त्याचा गैरवापर केल्यास आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण वापरत असलेला मोबाईल आणि सीमकार्ड अधिक जागृतपणी वापरले पाहिजे तरच आपण सुरक्षित राहू शकतो.