राज्यसरकारने सोयाबीन आणि कापुस उत्पादनसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. सरकारने २९ सप्टें.-24 पासुन शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. परंतु या अनुदानासाठी ई-केवायसी असणे गरजेचे आहे. परंतु हि केवायसी कशी करायची हे आपण या लेखात पाहणार आहोत. Soyabean subsidy
आधार ई-केवायसी करणे का गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी कृषीविभागाची संपर्क साधुन ही केवायसी करुन घेणे गरजेचे आहे. असे आवाहान सरकारने केले आहे. २६ सप्टें 24 ला ही बातमी आली होती. व २९ सप्टें.-24 ला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. ९६ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार संमतीपत्र कृषी विभागाला सादर केले आहे. आता पर्यतच्या रिपोर्टनुसार २१ लाख शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे. जर शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली नाही तर शेतकरी अनुदानापासुन वंचित राहणार आहे. त्यामुळे कृषी विभागाकडुन केवायसी करण्याचे आवाहन सरकार केले आहे.soyabean subsidy
या माध्यमातून करता येते KYC
शासकीय अनुदान मिळविण्यासाठी KYC करणे अत्यंत गरजेचे असते. ही केवायसी आता शेतकरी तीन विविध मार्गांनी करु शकणार आहेत.
- कृषी सहाय्यक – राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी सहाय्यक नेमण्यात आलेले आहेत. हे कृषी सहाय्यक तालुका पातळीवर नेमण्यात आलेले असून ते शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देतात व त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून संपुर्ण मदत करतात. या कृषी सहाय्यकांच्या मदतीने तुम्ही सोयाबीन कापुस उत्पादन अनुदान मिळविण्यासाठी केवायसी करुन घेऊ शकता.
- ई सेवा केंद्र – शहरी आणि ग्रामिण भागात शासनाने ई सेवा केंद्र स्थापन केले आहेत. ही केंद्रे नागरिकांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आली असून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरुन देणे, शासकीय आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देणे आणि नागरिकांना ऑनलाईन प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करणे ही काम ई सेवा केंद्रमार्फत केली जातात. त्यामुळे येथे जाऊन देखील शेतकरी केवायसी करु शकतात.
- प्रत्यक्ष संकेतस्थळावर जाऊन – सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईलमध्ये इंटरनेट देखील असते. त्याच्या उपयोगातून शेतकरी स्वताःच घरच्या घरी शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाऊन केवायसी करु शकतात. तेही आधार कार्डच्या मदतीने. चला तर मग पाहूया आधार कार्डच्या मदतीने घरच्या घरी मोबाईलच्या वापराने केवायसी कशी करायची. Soyabean subsidy
आधार ई-केवायसी कशी करायची
- गुगल ओपन करणे व https://scagridbt.mahait.org/ या लिंकवर क्लिक करा.
- वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हांला Disbursement Status या पर्यायावर क्लिक करणे.
- तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो तुम्हाला येथे टाकायचा आहे.
- त्यानंतर एक पेज ओपन होईल त्यावर तुमची वैयक्तिक माहिती दिसेल.
- पीक क्षेत्रानुसार तुम्हांला किती अनुदान मिळणार आहे हे ही येथे दिसते. Soyabean subsidy
अनेक शेतकऱ्यांना स्मार्ट फोन वापरता येत नसल्याने त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडुन ही केवायसी करुन घ्यायची आहे. जास्तीत शेतकऱ्यांना यांचा फायदा व्हावा यासाठी ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यत पोहोचवावी. Soyabean subsidy. अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन आणि कापूस उत्पादक असाल तर केवायसी करुन शासकीय अनुदानासाठी पात्र ठरू शकता. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घ्या. आमच्या वेबसाईट सोबत जोडले जा आणि शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासकीय योजनांची माहिती आम्ही पोस्टच्या माध्यमातून देत आहोत. ती माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरु नका. Soyabean subsidy