Soybean Crop: सोयाबीनची आवक घटली, दर कोसळले, खाद्यतेलास मागणीही कमी: पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे

Soybean Crop

Soybean Crop शेतकऱ्यांची शेती ही जशी पावसावर अवलंबून असते तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाचा किती भाव मिळणार आहे हे बाजारावर अवलंबून असते. जेव्हा एखाद्या धान्याची बाजारात आवक कमी होतो म्हणजेच घटते तेव्हा त्या धान्याचे दर वाढतात. परंतु एखाद्या धान्याचे उत्पादन जास्त झाल्यास मात्र त्या धान्याचे बाजार भाव कमी होतात. परंतु अगदी याउलट सोयाबीनच्या पीकाच्या बाबातीत होताना दिसून येत आहे. सोयाबीनची बाजारात येणारी आवक घटली  असली तरी मात्र सोयाबीनचे दर वाढताना दिसून येत नाहीत आणि खाद्यतेलाची मागणीही कमी होत असताना दिसत आहे. याची नेमकी काय कारणे आहेत आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर याचे कोणकोणते परिणाम होणार आहेत याचे सविस्तर विश्लेषण आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

सोयाबीनचा आजचा बाजार भाव कसा पहायचा? Soyabean Rate Today

प्रत्येक धान्याचे बाजार भाव हे त्या त्या जिल्ह्याच्या बाजारपेठे नुसार ठरत असतात. तसेच सोयाबीनचा आजचा बाजारभाव हा सरासरी  4200रु /क्विंटल  इतका आहे. तुम्हाला देखील प्रत्येक दिवसाला बदलणारा सोयाबीनचा बाजारभाव प्रत्येक जिल्ह्यानुसार जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही  https://www.bajarbhav.in/soyabin-bazar-bhav/ या वेबसाईटला भेट द्या.

सोयाबीनची आवक घटण्यामागचे कारण

यंदा झालेला पाऊस हा कधी जास्त तर कधी कमी अशा प्रमाणात होता. बऱ्याच ठिकाणी गारांचा पाऊस पडला, तसेच हवामान देखील ढगाळच होते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सोयाबीनचे पीक कमी आले आणि पर्यायाने बाजारात देखील सोयाबीनची आवक घटली.

Soybean Crop सोयाबीनच्या दरात घट होण्याचे कारण

भारतीय बाजार भावांचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांच्या मते,  दिवाळीनंतर बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या मागणीत मोठी घट झाली होती.  तसेच तांदूळ पेंडच्या निर्यातीवरील बंदीला एका वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. यामुळे सोयाबीनचे भाव वाढले,  तर सोयापेंडलाही निर्यात बंदी येऊ शकते अशी भीती असल्याने सोयाबीनचे भाव जाणून-बुजून दबावात ठेवले गेले आहेत.  तसेच  केंद्र सरकारने सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावे यावर उपाय म्हणून खाद्यतेलावर आयात शुल्क लागू केलेले नाही. याचे परिणाम असे झाले की, परदेशातून मोठय़ा प्रमाणावर खाद्यतेल  आयात केले जात आहे. आफ्रिकेतील खाद्यतेल मोठय़ा प्रमाणात आपल्या देशात मागवले जात आहे. त्यामुळे भारतातील सोयाबीन खाद्यतेलाचे भाव सोययाबीनची आवक घटली तरी वाढलेच नाहीत. यामुळे सोयाबीनला बाजारात कमी दर मिळत असल्याचे दिसून येते.

आपल्या दैनंदिन जीवनातील सोयाबीनचा उपयोग समजून घेऊ

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोयाबीन हे अत्यंत पौष्टिक असल्याने त्यापासून बनणाऱ्या खाद्यतेलाला महत्त्व आहे. तसेच सोयाबीनपासून इतरही पदार्थ बनवले जातात ते म्हणजे सोयाबीन तूप, सोयाबीन दूध, सोयाबीन टोफू,  सोयाबीन केक, सोयाबीन फ्लोर, सोयाबीन नूडल्स देखील बनवले जातात. सोयाबीन वडी बनवून बाजारात विक्रीस ठेवली जाते.  

सोयाबीनचे आरोग्यदायी फायदे

  • सोयाबीन या धान्याचे आरोग्यदायी फायदे देखील खूप आहेत. सोयाबीन म्हणजे प्राणवायु वर्धक अशी गुणवत्ता असलेले धान्य आहे.
  • सोयाबीनमुळे रक्तदाब कमी  होतो. त्यामुळे आपल्या आहारात सोयाबीनच्या पदार्थांचा समावेश केल्यास हृदयरोगांचा त्रास कमी होतो.
  •  शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
  • हल्ली  सगळीकडेच मधूमेहाचे पेशंट दिसून येतात, शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी देखील सोयाबीन मदत करते. म्हणजेच सोयाबीनमुळे मधूमेह नियंत्रणात राहतो.

दुभत्या जनावरांच्या आहारात सोयाबीनचा वापर

  • सोयाबीन हे जनावरांच्या आहारासाठी देखील चांगले असते, त्यामुळे ते पशुधन आहारात वापरले जाते
  • सोयाबीनमुळे  पशुंना पौष्टिकता मिळते, दुभती जनावरे जास्त दुध देतात

महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक जास्त प्रमाणात घेणाऱ्या जिल्ह्यांची यादी

भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी सर्वात जास्त म्हणजे 40% उत्पादन फक्त महाराष्ट्र राज्यात होते. यावरून राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान, सोयाबीनलाचं गेल्या दोन वर्षांपासून चांगला दर मिळत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक जास्त प्रमाणात केले जाते. त्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे.

  • लातूर जिल्हा
  • बुलढाणा जिल्हा
  • वाशिम जिल्हा
  • अकोला जिल्हा
  • यवतमाळ जिल्हा
  • अमरावती जिल्हा
  • नागपूर जिल्हा
  • परभणी जिल्हा
  • हिंगोली जिल्हा
  • जालना जिल्हा
  • औरंगाबाद जिल्हा