SSC GD Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीचं स्वप्नं बाळगून असणाऱ्यांसाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) एक जबरदस्त संधी घेऊन आलं आहे. SSC GD Bharti 2024 अंतर्गत तब्बल 39481 जागांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. तुमचं शिक्षण जर किमान 10वी, 12वी पास किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल, तर या भरतीमध्ये सहभागी होऊन तुमच्या सरकारी नोकरीचं स्वप्नं साकार करण्याची ही एक सुवर्णसंधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे.
SSC अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तुमच्यासमोर आहे. या भरती अंतर्गत अर्जाची अंतिम मुदत ही 14 ऑक्टोबर 2024 अशी देण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे अर्ज वेळेत अर्ज सादर करा.
SSC GD Bharti 2024 ही संपूर्ण भारतभरात राबवली जाणार आहे. या भरतीसाठी 05 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 39481 उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कॉन्सटेबल पदांसाठी विविध सुरक्षा दलांमध्ये (जसे की BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, आणि असाम रायफल्स) ही पदे उपलब्ध आहेत.
SSC GD Bharti 2024 | पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा
शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा पास केलेली असावी.
वयोमर्यादा | Age Criteria
- 1 जानेवारी 2025 रोजी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा: 18 ते 23 वर्षे.
- 1 जानेवारी 2025 रोजी मागासवर्गीय, महिला, अपंग, माजी सैनिक प्रवर्गासाठी वयोमर्यादा: वयामध्ये 3 ते 5 वर्षांची सवलत.
अर्ज शुल्क | Application Fees
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी ही ₹100/- असणार आहे.
- तर मागासवर्गीय, महिला, अपंग प्रवर्गासाठी कोणतीही अर्ज फी घेण्यात येणार नाही.
वेतनश्रेणी | Salary Details
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21700 ते ₹61100 रुपये महिना वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे | SSC GD Bharti 2024 Important Documents
अर्ज करताना उमेदवारांकडे खालील कागदपत्र असणे आवश्यक असणार आहे:
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
- रहिवासी प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी)
- MSCIT प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक प्रमाणपत्रे
- कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
अर्ज करण्याची पद्धत | Mode of Application for SSC GD Bharti 2024
सर्व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण
उमेदवारांची नियुक्ती देशभरातील विविध विभागांमध्ये होणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया | Application Process
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत ऑक्टोबर 14, 2024 आहे, त्यामुळे उशीर न करता लवकरात लवकर अर्ज करा.
महत्वाची सूचना| SSC GD Bharti 2024 Imporatnt Note
अर्ज सादर करताना खालील गोष्टी विशेष करून लक्षात घ्या:
- अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्या.
- मोबाईलमधून अर्ज करताना डेस्कटॉप साइट वापरण्याचा सल्ला दिला जात आहे किंवा लँडस्केप मोड सिलेक्ट करा.
- कागदपत्रांची योग्य प्रकारे स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना फोटोवर तारीख असल्याची खात्री करा.
- मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वापरातला असावा, कारण अर्जाच्या पुढील प्रक्रियेची माहिती तुम्हाला SMS किंवा ई-मेलद्वारे मिळणार आहे.
निवड प्रक्रिया | Selection Process
SSC GD Bharti 2024 अंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणं शक्य नाही, त्यामुळे अर्ज नीट तपासूनच सादर करा.
अर्जाची लिंक व अधिकृत जाहिरात
अधिकृत जाहिरात व अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करावा:
अधिकृत जाहिरात PDF
https://drive.google.com/file/d/1AqKATRNCQ8A8ita8EV9iLX3ZCXNbtvA0/view
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक