खालील स्टेप वापरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
सर्वप्रथम mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा.
Farmer Login या पर्यायावर क्लिक करा.
वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडा.
त्यानंतर तुमचा Farmer ID टाका.
जर Farmer ID माहिती नसेल, तर खाली दिलेल्या पर्यायातून तो शोधता येतो.
Farmer ID टाकल्यानंतर OTP पाठवा या बटणावर क्लिक करा.
मोबाईलवर आलेला OTP टाका आणि OTP तपासा करा.
पुढील प्रक्रिया
लॉगिन झाल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर कॅटेगरी आणि बँक तपशील भरावे लागतील. माहिती आधीच भरलेली असेल, तर ती तशीच दिसेल.
यानंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
खाली स्क्रोल करून “बियाणे वितरण – प्रात्यक्षिक – फ्लेक्सी” हा पर्याय निवडा.
“बाबी निवडा” वर क्लिक करा.
फार्मर ID आणि गट निवड
येथे तुमचा फार्मर आयडी निवडायचा आहे.
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गट असतील, तर ज्या गटात भुईमूग किंवा तीळ लावायचे आहेत तो गट निवडा.
गट निवडल्यावर सर्वे नंबर आपोआप दिसेल.
हंगाम, पीक आणि क्षेत्र निवड
हंगाम म्हणून उन्हाळी निवडा.
घटक म्हणून प्रमाणित बियाणे वितरण निवडा.
पीक प्रकारात गळीत धान्य निवडा.
पीक निवडताना भुईमूग किंवा तीळ यापैकी एक निवडा.
यानंतर प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये टाका.
लक्षात ठेवा, किमान 1 हेक्टर क्षेत्र टाकणे आवश्यक आहे.
क्षेत्र योग्य टाकल्यावर बियाण्याचे प्रमाण आपोआप दिसेल.
अर्ज सादर करा
माहिती भरल्यानंतर जतन करा वर क्लिक करा.
नंतर अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर 23 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.
आधी अर्ज केलेला असेल, तर पेमेंट करावे लागणार नाही.
पावती आणि बियाणे मिळवणे
अर्ज झाल्यानंतर घटक इतिहास पहा या पर्यायावर क्लिक करा.
तेथे तुमचा अर्ज दिसेल.
अर्जाची पावती डाउनलोड करून ठेवा.
ही पावती घेऊन तहसील कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला भुईमूग किंवा तीळ बियाणे मोफत मिळणार आहे.
ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
1 thought on “ऑनलाईन अर्ज करा.”
Comments are closed.