Sukanya Samriddhi Yojana 2023 संबंधीत नवीन नियम जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या आलेत. बेटी बचाव बेटी पढाओ सारख्या योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजात रुजत आहेत, अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. देशातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी तसेच मुलीला स्वावलंबी बनण्यासाठी,  मुलगी सज्ञान झाल्यावर तिला तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे, या संपूर्ण उद्देशाने केंद्र शासनाने सन 2015 पासून सुकन्या समृद्धी योजना 2022 या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे

सुकन्या समृद्धी योजना 2023 संपूर्ण माहिती – sukanya samriddhi yojana in details

केंद्र सरकारने देशातील मुलींच्या भविष्याच्या सुरक्षितेसाठी बेटी बचाओ बेटी पाढाओ या अभियाना अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरु केली.  हि एक लघु बचत योजना आहे, या योजनेंतर्गत मुलींचे पालक किंवा कायदेशीर संरक्षक मुलींच्या नावाने हे बचत खाते उघडू शकतात, आणि योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मुलीच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एक रकमी धनराशीची गुंतवणूक करू शकतो. केंद्र शासनाने सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी मुलींची वयोमर्यादा 10 वर्षापेक्षा जास्त नसावी, ज्यांना मुलगी आहे असे पालक  देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा निर्धारित राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मुलींच्या नावे बचत खाते उघडू शकतात. योजनेंतर्गत सुरवातीला 1000/- रुपये जमा करणे आवश्यक होते परंतु नंतर शासनाने या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढावी या दृष्टीकोनातून या बचत योजनेची गुंतवणुकीची मर्यादा कमी करून वार्षिक 250/- रुपये प्रतिवर्ष इतकी करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजना नवीन नियम

 भारतातील मुलींचे भविष्य यशस्वी आणि सुरक्षित करण्यासाठी  केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. आर्थिक धोरणानुसार 2023 मध्ये या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.  

  • बचत खात्यात ठरल्याप्रमाणे दरमहा नियमित रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
  • हे बचत खाते मुलीचा जन्म झाल्यानंतर दहा वर्षापर्यंत उघडले जाते. यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे बचत खाते सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी किमान 250/- रुपये गुंतविणे बंधनकारक होते,
  • जर का 250/- रु. ही रक्कम जमा न केल्यामुळे बचत खाते डिफॉल्ट समजले जात असे,  2023 मध्ये शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमांप्रमाणे, पालकांना कमीत कमी ठरलेली रक्कम जमा न करता आली, काही अडचण असेल तरी देखील बचत खाते डिफॉल्ट होणार नाही.
  •  सुकन्या समृद्धी योजनेत बचत खात्याची मॅच्युरीटी होईपर्यंत खात्यात जमा असलेल्या धनराशीवर  दर वर्षीच्या आर्थिक धोरणाप्रमाणे ठरविण्यात आलेल्या नियमांनुसारच  व्याज दिले जाईल.

सुकन्या समृद्धी योजनेबाबत IPPB मोबाईल ऍप्लिकेशनची सुविधा

भारतीय पोस्ट ऑफिसव्दारे नागरिकांच्या सुविधेसाठी एक मोबाईल अप्प्लीकेशनची सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे खातेधारकांना पोस्टाचे व्यवहार करणे सुलभ होणार आहे, खातेधारक सहजतेने त्यांच्या सेविंग खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करू शकतील, या अॅपच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना आणि इतर पोस्टाच्या योजनांमध्ये सुद्धा पैसे जमा करता येईल. त्याचप्रमाणे या मोबाईल ऍपच्या मदतीने घरबसल्या  सुकन्या समृद्धी योजनेचे डिजिटल खाते सुरु करता येते. 18 वर्षावरील कोणीही जे भारताचे नागरिक आहे अश्यांना  आधार व पॅनकार्डच्या मदतीने ऑनलाईन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते.  तसेच दर 12 महिन्यानी खात्याची KYC करणे आवश्यक असते.

सुकन्या समृद्धी योजना 2023 उद्दिष्टे

  •  केंद्र शासनाने सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे दारिद्र्य रेषेखालील घरातील किंवा साधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे.
  • शैक्षणिक प्रगती करून  मुलींना समृद्ध जीवन जगता यावे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व्हावे,
  • देशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. तो समतो साधावा व स्त्री भ्रूण हत्या थांबावी हा या योजनेचा उद्देश आहे,

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत अधिकृत बँकांची यादी

सुकन्या समृद्धी योजनेसाठी बचत खाते सुरु करण्यासाठी पालकांना सोयीचे व्हावे म्हणून भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून अधिकृत केलेल्या एकूण 25 बँकांची यादी आम्ही येथे देत आहोत.  मुलीचे पालक खालीलपैकी कोणतीही बँक निवडून सुकन्या सामृद्धी योजनेचे बचत खाते सुरु करु शकतात, आणि त्यांच्या मुलीला या  योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतात.

  • अॅक्सिस बँक
  • युनियन बँक ऑफ इंडिया
  • विजय बँक
  • आंध्र बँक
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • कॅनरा बँक
  • देना बँक
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • अलाहाबाद बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • स्टेट बँक ऑफ पटियाला
  • स्टेट बँक ऑफ मैसूर
  • इंडियन ओव्हरसीज बँक
  • युको बँक
  • इंडियन बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • IDBI बँक
  • बँक ऑफ इंडिया
  • कॉर्पोरेशन बँक
  • आयसीआयसीआय बँक
  • सिंडिकेट बँक
  • स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपूर
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
  • ओरियेंटल बँक ऑफ कॉमर्स
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद पंजाब आणि सिंध बँक