Thane Mahanagarpalika Bharti 2025: महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी चालून आलेली असल्याचं बघायला मिळत आहे. गट “क” आणि “ड” मधील (Thane Mahanagarpalika Group C and D Jobs) विविध पदांसाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने तब्बल १७७३ रिक्त जागांची मेगाभरती जाहीर केली असून, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक ऐतिहासिक संधी ठरू शकणार आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी भरती ही अगदीच क्वचित केली जाते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी अजिबात (Thane Municipal Corporation Vacancy) गमावू नये आणि लवकरात लवकर या भरती संबंधीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
भरतीची मुख्य वैशिष्ट्ये
या भरतीत प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, आरोग्य, वैद्यकीय तसेच शिक्षण विभाग अशा विविध सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही भरतीची संधी खुली झाली आहे.
- एकूण जागा: १७७३
- अर्ज सुरू होण्याची तारीख: १२ ऑगस्ट २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ सप्टेंबर २०२५
- अधिकृत वेबसाइट: www.thanecity.gov.in
या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने (TMC Recruitment 2025 Apply Link) करण्याची निश्चित करण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांनी कोणत्याही कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याची गरज असणार नाही. अधिकृत वेबसाइटवरूनच सगळ्या पात्र उमेदवारांना थेट अर्ज भरता येणार आहे.
अर्ज शुल्क
ठाणे महानगरपालिकेच्या या मेगाभरतीसाठी उमेदवारांना खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
- खुला प्रवर्ग: ₹१०००/-
- मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ.: ₹१००/-
- माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ
या भरतीची विशेष बाब म्हणजे, या अंतर्गत परीक्षा हे शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. तसेच जर उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यांना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना स्वतंत्र शुल्क भरण्याचीही आवश्यकता असणार आहे. एकदा भरण्यात आलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही, ही गोष्ट उमेदवारांनी अवश्य लक्षात ठेवावी.
वयोमर्यादा
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, २ सप्टेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे,
- खुला प्रवर्ग: किमान १८ वर्षे, कमाल ३८ वर्षे
- मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ: कमाल ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवार: कमाल ४५ वर्षे
याशिवाय, ठाणे महानगरपालिकेत आधीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेच्या नियमातून सूट देण्यात आलेली आहे.
भरतीची वैशिष्ट्ये आणि संधी
ही भरती केवळ सरकारी नोकरी मिळवण्याची संधी नाही, तर स्थैर्य, चांगला पगार, नोकरीतील सुरक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची देखील एक सुवर्णसंधीच आहे. भारती अंतर्गत असलेल्या १७७३ पदांमुळे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असून, यामुळे शहरातील नागरी सेवा अधिक बळकट होणार आहे.
आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील भरतीमुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळेल. शिक्षण विभागात होणाऱ्या भरतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होतील. तसेच अग्निशमन आणि तांत्रिक विभागातील भरतीमुळे आपत्कालीन सेवांमध्ये कार्यक्षमता वाढणार आहे.
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम उमेदवारांनी www.thanecity.gov.in या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
- त्यानंतर भरती विभागात जाऊन “ऑनलाइन अर्ज” हा पर्याय निवडा.
- याठिकाणी तुमची आवश्यक माहिती जसे की, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार माहिती, शैक्षणिक तपशील इत्यादी माहिती व्यवस्थित भरून, विचारण्यात आलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.
- त्यांनतर तुम्हाला परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावं लागणार आहे.
- शेवटी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि त्यानंतरच तुमचा अर्ज सबमिट करा, तसेच त्याची एक प्रिंटआउट तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
पात्रता निकष
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता (Thane Mahanagarpalika Eligibility Criteria) वेगळी आहे. काही पदांसाठी दहावी किंवा बारावी आवश्यक आहे, तर काही पदांसाठी पदवी, अभियांत्रिकी किंवा तांत्रिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेला अभ्यासक्रम व पात्रता तपासून अर्ज करावा.
ठाणे महानगरपालिकेची १७७३ पदांसाठी मेगाभरती ही खरोखरच मोठी संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी ही संधी नक्की साधावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख (TMC Bharti Last Date 2025) २ सप्टेंबर २०२५ आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका आणि लवकरात लवकर अर्ज करा.