Track your mobile using find my device app: अँड्रॉइड मोबाईलचे फाइंड माय डिवाइस हे ॲप कसे वापरावे

Track your mobile using find my device app

Track your mobile using find my device app सध्या टेक्नॉलॉजी इतकी अपग्रेड झाली आहे की, आपण झटक्यात आपले अनेक प्रश्न सोडवू शकतो. आपला फोन म्हणजेच आपली अत्यंत मुलभूत गरज झाली आहे. फोन हा सध्या अत्यंत गरजेची वस्तू बनला आहे. त्यामुळे हाच फोन हरवला तर आपलं संपुर्ण जग थांबल्यासारखं होतं. कारण कॉन्टॅक्टपासून ते बँकिंग व्यवहारांपर्यंत आपल्या सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी फोनमध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे आपला फोन हरवला तर आर्थिक नुकसान होण्यासोबतच आपल्याला मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा देखील गमवावा लागू शकतो. पण सध्या टेक्नॉलॉजी इतकी अपग्रेड झाली आहे की,  आपण अगदी सोप्या पद्धतीने हरवलेल्या फोनला सहज ट्रॅक करू शकतो. आजच्या आपल्या लेखाच आपण हिच माहिती मिळवणार आहोत. Track your mobile using find my device app

 आपल्या फोनची ही सेटिंग करुन ठेवा.

सध्या आपण असे म्हणू शकतो की, मोबाईल हे महत्त्वाच्या डिव्हाइसपैकी एक आहे. फोनच्या माध्यमातून अनेक कामे मिनिटात शक्य होतात. त्यामुळे फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होते. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशा काही सोप्या ट्रिक्स ज्याच्या मदतीने तुम्ही हरवलेला स्मार्टफोन मोबाईल अगदी सहज शोधू शकता. तुम्ही हरवलेला फोन स्विच ऑफ असताना देखील सहज ट्रॅक करू शकता.

आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये सध्या Google map हे ऍप असते. या ऍपच्या मदतीने आपण आपला हरवलेला फोन पुन्हा मिळवू शकतो. आपल्याला इतकंच करायचं आहे की, आपल्या गुगल मॅपमध्ये जाऊन share location हा पर्याय निवडून आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर आपले लोकेशन शेअर करुन ठेवायचे. किंवा आपल्याकडे दोन फोन असतील तरी दुसऱ्या फोनवर आपण लोकेशन शेअर करुन ठेवायचे जेणाकरुन एक फोन चोरीला गेला, किंवा हरवला तर तो गुगल मॅपच्या मदतीने आपल्याला ट्रॅक करता येईल. Track your mobile using find my device app

Find My Device चा वापर करुन शोधा तुमचा अँड्रॉइड मोबाईल

तुम्ही जर का तुमचे गुगल अकाऊंट वापरून अँड्रॉइड फोनची सेटिंग केली असेल तर Find my device  फाईंड माय डिवाइस तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप सेटअप झालं असेल. तुम्ही फाईंड माय डिवाईस या ऍपच्या वैशिष्ट्याचा वापर करून तुमच्या फोनवर खूप मोठ्याने रिंग प्ले करू शकता. अट इतकीच आहे की, तुम्ही फोनपासून रिंग ऐकू येईल इतक्या अंतरावर असणे गरजेचे आहे.  त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पुढील स्टेप्स फॉलो करा Track your mobile using find my device app

  • डेस्कटॉप कंप्यूटर, लॅपटॉप किंवा दुसऱ्या मोबाइल डिवाइसवर वेब ब्राऊजर ओपन करा आणि android.com/find या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्हाला इथे तुमच्या हरवलेल्या मोबाइलमध्ये साइन इन असलेल्या गुगल अकाऊंटनं साइन इन करा.
  • जर का तुमच्याकड़े एका पेक्षा जास्त अँड्रॉइड फोन असतील तर साइड बारमधून हरवलेल्या फोनची निवड करा.
  • त्यानंतर ‘Play Sound’ मेनूची निवड करा.
  •  हे करताच तुमच्या अँड्रॉइड फोनवर मोठ्याने रिंग वाजू लागेल जरी तुमचा फोन सायलेंटवर असला तरी देखील ही रिंग वाजतच राहील. इतकेच नाही तर ही रिंग 5 मिनिटे सुरुच राहील.
  • मोबाइलवर पॉवर बटन प्रेस करून किंवा फाईंड माय डिवाइसवर stop ringing  प्रेस करून देखील रिंग बंद करता येईल.
  • अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे वैशिष्ट्य वापरताना Device located हे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मोबाईलवर दिसले पाहिजे.

Find my Device या ऍपच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन तर शोधू शकताच. सोबतच तुम्ही तुमच्या मोबाईलमधील डाटा आणि महत्त्वाचे आर्थिक व्यवहारांसबंधीचे पासवर्ड्स देखील राखून ठेवू शकता. अत्यंत महत्त्वाचे आणि प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन ठेवावे असे हे ऍप आहे. तुम्ही देखील आजच हे ऍप डाऊनलोड करा. आणि भविष्यात तुमचा फोन चोरीला गेला किवा हरवला तर तुम्हाला नक्कीच या ऍपचा फायदा होईल. Track your mobile using find my device app