Tractor Scheme for Women: अरे व्वा! महिलांना ट्रॅक्टर फक्त अर्ध्या किमतीत! बघा कशी मिळणार मदत आणि कुठे करावा अर्ज?

Tractor Scheme for Women: महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. गेल्या काही वर्षांत महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सोय व दिलासा मिळावा म्हणून विविध महत्त्वाच्या योजना सुरू झाल्या आहेत. जसे की, लाडकी बहीण योजना तर महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली, तसेच एसटी बस प्रवासात 50 टक्के सवलत दिल्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्चही कमी झाला आहे. त्याचबरोबर, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याद्वारे मोफत गॅस कनेक्शन मिळाल्याने स्वयंपाकघरातील आरोग्य व स्वच्छतेत सुधारणा झाली. या योजनांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली. आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची योजना जोडली गेली आहे, आणि ती म्हणजे महिला शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर मिळण्याची संधी.

ही योजना कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (Sub Mission on Agricultural Mechanization, SMAM) अंतर्गत राबवली जाते. या योजनेमागचा सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, तो असा की लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री सहज उपलब्ध करून देणे. विशेष बाब म्हणजे, या योजनेत महिलांसाठी जास्तीत जास्त सवलतीची तरतूद केली आहे. म्हणजेच, महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करताना तब्बल 50 टक्के सबसिडी (Government Subsidy on Tractors) मिळणार आहे.

महिलांना मिळणारा थेट फायदा

समजा, एखाद्या महिला शेतकऱ्याला 4.5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, तर या योजनेअंतर्गत तिला अर्ध्या रकमेवर हा ट्रॅक्टर मिळेल, म्हणजेच त्या महिलेला 2.25 लाख रुपये भरावे लागतील, आणि उर्वरित अर्धी रक्कम ही सरकारकडून दिली जाईल. हाच ट्रॅक्टर जर एखाद्या पुरुष शेतकऱ्याने घेतला, तर त्याला केवळ 40 टक्के सबसिडी मिळेल आणि त्याला सुमारे 2.70 लाख रुपये स्वतः द्यावे लागतील. म्हणजेच महिलांना पुरुषांच्या तुलनेत थेट 45 हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळतो.

योजनेचे महत्त्व काय?

शेतीत आधुनिक साधनांचा वापर झाल्यास उत्पादनक्षमता वाढते, श्रम कमी लागतात आणि वेळेची बचतही होते. परंतु, ट्रॅक्टरसारखी महागडी यंत्रसामग्री घेणे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या आवाक्यात नसते. आणि इथेच ही योजना महिलांसाठी संजीवनी ठरते. ट्रॅक्टर मिळाल्यानंतर (Women farmer subsidy scheme Maharashtra) महिला शेतकरी केवळ स्वतःच्या शेतातच नाही, तर शेजारील शेतकऱ्यांना सेवा देऊनही अतिरिक्त उत्पन्न कमावू शकतात. त्यामुळे ही योजना त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतेच, पण समाजात त्यांचा सहभाग आणि आत्मविश्वासही वाढवण्यास ही सहाय्य करत.

निधीची रचना कशी आहे?

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 90 टक्के आणि राज्य सरकारकडून 10 टक्के निधी दिला जातो. म्हणजेच संपूर्ण आर्थिक भार महिलांच्या खांद्यावर न टाकता सरकार मोठी जबाबदारी उचलते. यामुळे देशातील ग्रामीण भागातील महिलांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री सहज उपलब्ध होऊ शकते.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे (Documents required for tractor subsidy) आवश्यक आहेत. ही कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत,

• आधार कार्ड
• बँक पासबुकची प्रत
• जमीन नोंदी (खसरा/खतौनी)
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• उत्पन्न आणि जातीचा दाखला (गरज असल्यास)
• महिला शेतकरी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड, शेतकरी नोंदणी)

अर्ज करण्याची पद्धत

महिला शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Tractor subsidy online application India) पूर्ण करावी लागणार आहे. अर्ज करण्यासाठी योजनेच्या खाली दिलेल्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी.

https://agrimachinery.nic.in
https://myscheme.gov.in

अर्ज करण्यासाठी या पोर्टलवर प्रथम आपली नोंदणी करावी, आवश्यक माहिती भरावी आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर महिलांना थेट 50 टक्के अनुदानाचा लाभ मिळतो.

ग्रामीण भागातील महिला शेतकरी आजही अनेक आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. शेतीसाठी लागणारी साधने व तंत्रज्ञान त्यांच्या आवाक्यात नसल्याने त्यांना दुहेरी मेहनत करावी लागते. परंतु या योजनेमुळे त्यांना त्यांच्या कामात मदतच होणार आहे. सरकारचा हा उपक्रम महिलांसाठी खरोखरच क्रांतिकारक ठरू शकतो.