ऑफिस अवर मध्ये होणारे ट्रॅफिक असो किंवा सणांच्या दिवसांत होणारे ट्रॅफिक असो. शहरी भागांतील रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांना हे काही नवीन नाही. शहरांमध्ये ट्रॅफिक नियंत्रणात रहावे यासाठी ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलिस उभे असतात. हे ट्रॅफिक पोलिस वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड द्यायला लावतात. अनेक वाहनचालक या ट्रॅफिक पोलिसांना घाबतात, परंतु आता ही चिंताच मिटली आहे. कसं ते जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा. Traffic Polie location on google map
ठिकठिकाणी असलेल्या ट्रॅफिक पोलिसांचा डोक्याला ताप
प्रत्येक राज्याच्या शहरी भागांमध्ये ठिकठिकाणी नेमण्यात आलेले ट्रॅफिक पोलिस अनेकदा वाहनचालकांच्या डोक्याचा ताप बनत आहेत. खरं तर या ट्रॅफिक पोलिसांना वाहतुकीच्या नियंत्रणासाठी नेमण्यात आलेले असते. परंतु अनेकदा हे पोलिस विनाकारण वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचे प्रसंग झालेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी ट्रॅफिक पोलिसांना पाहिलं की त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे असूनही त्यांना घाम फुटतो. पैसे जाण्याची भीती असते. Traffic Polie location on google map
सोशल मिडियावरील पोस्ट होत आहेत व्हायरल
सोशल मीडियावर @kiraataka_2 या व्यक्तीची एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आलेली पोस्ट भन्नाट व्हायरक होत आहे. कारण त्या पोस्टमध्ये एका तरुणाने एका वापरकर्त्याने या पोस्टच्या कमेंटमध्ये पोस्ट कर्त्याने म्हटले आहे की आता ट्रॅफिक पोलिसांचे लोकेशन शोधणे सोपे झाले आहे. गुरू मंदगड्डे एक्स (ट्विटर) युजर या नावाने @kiraataka_2 ट्विटर अकाऊंटवर गूगल मॅप्सचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, गूगल मॅपवर ‘Police irt’ असे टाईप केल्यानंतर काही सेकंदातच तुमच्या लोकेशनच्या जवळ असेलेल ट्रॅफिक पोलिसांचे 10 लोकेशन्स तुम्हाला मिळतील. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा मार्ग निवडू शकता. Traffic Polie location on google map
कसे शोधायचे ट्रॅफिक पोलिसांचे लोकेशन?
शहरी भागातील ट्रॅफिक पोलिसांकडून रोजच ठरावीक ठिकाणी हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणाऱ्यांवर, विना वाहन परवाना गाडी चालवणे, ट्रिपल सीट वाहनचालकांची तपासणी केली जाते आणि कारवाई केली जाते. परंतु आता अचानक एखाद्या सिल्गनलच्या कोपऱ्यात दिसणाख्या या ट्रॅफिक पोलिसांपासून पिच्छा सोडवण्याची एक नामी संधी सर्वांना सापडली आहे. Police irt असे गुगल वर टाईप करुन सर्च केले असता तुम्हाला किमान 10 अशी लोकेशन्स दिसतील ज्याठिकाणी ट्रॅफिक पोलीस उभे आहेत. हेल्मेट किंवा लायसन्सशिवाय, तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती त्या दिशेने प्रवास करीत असल्यास, गूगल मॅपवर दाखविलेले ते लोकेशन लक्षात घेऊन, प्रवासासाठी दुसरा मार्ग निवडू शकणार आहेत. Traffic Polie location on google map
नव्याने शोध लागलेल्या या सुवधेचा फायदा
Police irt असे गुगलवर टाईप केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात असलेले ट्रॅफिक पोलिसांचे 10 लोकेशन्स दिले जातात. त्यामुळे वाहनचालकांना अलर्ट मिळतो की, जवळच ट्रॅफिक पोलिस आहेत तर काळजी घेतली पाहिजे. योग्य कागदपत्रे सोबत ठेवली पाहिजे. योग्य ती काळजी घेतली पाहिजे. या सुविधेचा फायदा नक्कीच नागरिकांना होईल. त्यामुळे विनाकारण नागरिकांना त्रास देणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांपासून वाचण्याची संधी देखील वाहनचालकांना मिळणार आहे. अनेकदा हे ट्रॅफिक पोलिस उगीचच एखाद्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालकांना अडवतात आणि त्यांची उलट तपासणी सुरु करतात. सगळ्याच नागरिकांना वाहतुकीचे सगळेच नियम माहिती असतात असे नाही. त्यामुळे वाहनचालक देखील भांबाऊन जातात. याच संधीचा फायदा घेत हे ट्रॅफिक पोलिस चालकांकडून बक्कळ पैसा मिळवतात. गुगल मॅपच्या या सुविधेमुळे अनेक वाहनचालकांचा फायदा होणार आहे. Traffic Polie location on google map