UCO Bank Loan Scheme 2023: युको बँक देईल 2 लाख रु. पर्यंतचे वैयक्तिक कर्ज

UCO Bank Loan Scheme 2023

UCO Bank Loan Scheme 2023 भारतात विविध स्तरावर ग्रामिण आणि शहरी भागात विविध खाजगी बँका कार्यरत आहेत. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील सर्वात मोठा ग्राहकवर्ग. या ग्राहकवर्गासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बँका देखील आता भारतात त्यांच्या शाखा स्थापन करु लागल्या आहेत. त्यातीलच एक बँक म्हणजे युको बँक. UCO म्हणजेच united commercial bank असे या बँकेचे नाव आहे.  ही बँक भारताची राष्ट्रीयकृत बँक आहे. तसेच ही एक व्यावसायिक बँक आहे ती  भारत सरकारचा  एका उपक्रमाला सलग्न होऊन काम करीत आहे.  UCO बँकेचे मुख्य कार्यालय कोलकत्ता येथे असून भारताच्या विविध राज्यांमध्ये 34 प्रादेशिक कार्यालये आहेत.  

युको बँकेची स्थापना कधी झाली?

6 जानेवारी 1943 रोजी UCO बँकेची स्थापना झाली.  भारताव्यतिरिक्त, सिंगापूर, हाँगकाँग सारख्या देशांमध्ये या बँकेच्या 2500 पेक्षाही जास्त शाखा आहेत.

युको बँकेकडून किती रकमेचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते?

UCO बँकेकडून अर्जदाराचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर एखाद्या अर्जदाराला वैयक्तिक पातळीवर 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी अर्जदाराची Cibil score चांगला असणे आवश्यक असते.

युको बँकेकडून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जावर किती व्याज आकारले जाते?

 UCO बँकेकडून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 6.90%p.a पासून सुरु आहे. त्यातही महिलांसाठी UCO प्लोट रेट +3.40%p.a असून पुरुषांसाठी UCO प्लोट रेट +3.15%p.a इतका आहे.

UCO Bank Loan Scheme 2023 युको बँक वैयक्तिक कर्जासाठी अर्जदाराची पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय कमितकमी २१ वर्षे आणि जास्तीत जीस्त ७५ असावे.
  • व्यवसायिक किंवा नोकरदार या कर्जासाठी अर्ज करु शकतात
  • या कर्जामघ्ये अर्जदार कमीत कमी 1 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करु शकतात.
  • नोकरीस असलेल्या अर्जदाराने एकाच कंपनीमध्ये किमान 3 वर्षे सतत काम केलेले असावे.
  • PF, IT आणि इतर खर्च कापून तुमचे उत्पन्न एकूण पगाराच्या 40% पेक्षा कमी नसले पाहिजे.

UCO बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधारकार्ड, पॅनकार्ड
  • निवासी पुरावा असलेले लाईटबील आणि रेशनकार्ड
  • नोकरीस असलेल्या व्यक्तीची मागील 3 महिन्यांची पगाराची स्लीप
  • बँकेचे 6 महिन्याआधीपासूनचे अकाऊंट स्टेटमेंट
  • स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीचे आयटी रिटर्न केलेले दस्तावेज.
  • पासपोर्ट साईज फोटो

UCO बँकेकडून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया.

  • युको बँकेकडून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी https://www.ucobank.com/Hindi/homehindi.aspx या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्याच पानावर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळविण्यासंबंधी टॅब दिसेल त्यावर क्लिक केल्यास वैयक्तिक कर्जाअंतर्गत कोणकोणते कर्ज मिळू शकते यासंदर्भाची माहिती समोर येईल .
  • युको बँक पेंशन कर्ज योजना – UCO pension loan
  • युको बँक रोख पैसे कर्ज योजना-  UCO cash
  • युको बँक सुवर्ण कर्ज योजना – UCO Gold loan scheme
  • युको बँक दुकानदारांसाठी कर्ज योजना – UCO shopkeeper loan scheme
  • युको बँक सिक्युरिटिज –  UCO Securities
  • तुम्हाला ज्या प्रकारचे कर्ज हवे आहे त्याची निवड करा.
  • पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला संबंधी प्रकाराचे कर्ज मिळविण्यासाठीची माहिती समोर येईल.
  • तिथेच लाल रंगात एक आयताकृती बटण असेल त्यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडेल.
  • त्यात तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरुन विचारण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करुन सबमीट म्हणायचे आहे. UCO Bank Loan Scheme 2023
  • तुमचे आवेदन बँकेच्या आधिकाऱ्यांकडून तपासण्यात येईल आणि तुम्हाला बँकेकडून फोन येईल.

UCO बँकेकडून मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये

  • UCO बँकेकडून 2 लाख रुपयांपर्यत वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची सुरक्षा म्हणजे जामीन ठेवण्याची गरज नसते.
  • कर्ज परत फेडण्याचा कालावधी हा महिलांसाठी 60 महिने इतका आहे.
  •  कर्ज परत फेडण्याचा कालावधी हा पुरुषांसाठी 48 महिने इतका आहे.

शिक्षणासाठी, मुलांची फी भरण्यासाठी, लग्नाचा खर्च करण्यासाठी तुम्हा UCO बँकेकडे वैयक्तिक कर्जाची मागणी करु शकता.