Update your Aadhaar before 14 June: आत्ताच आधारकार्ड अपडेट करुन घ्या; नाहीतर या तारखेनंतर आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 10,000रु. भरावे लागतील.

सध्या आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. कोणत्याही शासकीय योजनेसाठी अर्ज करताना सर्वात प्रथम आधारकार्ड विचारले जाते. जानेवारी 2009  मध्ये UIDAI  म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या शासकीय संस्थेची स्थापना करण्यात आली.

भारतातील प्रत्येक रहिवाश्याची ओळख म्हणजे आधारकार्ड

Unique Identification Authority of India(UIDAI) असे आधारकार्डचे संपूर्ण विस्तारित नाव आहे. भारतातील प्रत्येक रहिवाश्याची ओळख म्हणून हे आधारकार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. या आधारकार्डच्या माध्यमातून भारत सरकारतर्फे प्रत्येक भारतीय नागरिकाला एक युनिक नंबर देण्यात आला आहे. हा नंबर 16 अंकी असून या नंबरच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाची ओळख ठरते. या आधार कार्डमध्ये प्रत्येक नागरिकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, हाताचे ठसे, डोळ्यांचे बायोमेट्रिकच्या मदतीने घेतलेले फोटो ही सर्व माहिती असते. Update your Aadhaar before 14 June

10 वर्षांपासून आधारकार्ड अपडेट केले नसल्यास

तुमचे आधारकार्ड अमान्य केले जाऊ शकते आणि 14 जूनच्या नंतर अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्याचे 10000 रुपयांपर्यंत पैसे भरावे लागू शकतात.

सपूर्ण भारतात आधार कार्ड वितरीत  करणारी संस्था असलेल्या UIDAI जाहीर केले आहे की, भारतातील सर्व नागरिकांनी दर 10 वर्षांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. आजूनही कोणी ते अपडेट केले नसेल तर 14 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अपडेट केल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड  अपडेट करण्यासाठी नागरिकांना 50 ते 100 रुपये इतके शुल्क भरावे लागू शकते. परंतु 14 जून 2024 पर्यंतच ही सुविधा उपलब्ध आहे. 14 जून नंतर भारतीय नागरिकांना त्यांचे आधारकार्ड अपडेट करायचे असल्यास त्यांना 10,000 रुपये भरावे लागणार आहे. इतकेच नाही तर भारतीय नागरिकांनी आधारकार्ड काढून 10 वर्षे झाली असतील आणि त्यांनी मागील 10 वर्षात एकदाही त्यांचे आधारकार्ड अपडेट केले नसेल आणि 14 जून ही तारीख निघून गेल्यास त्यांचे आधार कार्ड त्यांना कुठेही ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही. Update your Aadhaar before 14 June:

आधारकार्ड अपडेट करायचे दोन पर्याय

आधारकार्ड अपडेट करायचे दोन पर्याय शासनाने उपलब्ध करुन दिले आहेत. ते पुढील प्रमाणे

 • प्रत्येक नागरिकाने CSC सेंटर किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचे आधारकार्ड अपडेट करावे.
 • दुसरा पर्याय म्हणजे स्वत:हून UIDAI या अधिकृत वेबसाईटवर  ऑनलाइन अपडेट करावे.

 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना त्यांचा पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती भरुन मग इतर ओळखपत्रं म्हणजेच पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट करायचे आहे. 

14 जूनच्या आधी मोफत ऑनलाइन आधार असे अपडेट करा

 • UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://uidai.gov.in/mr/my-aadhaar-mr/update-your-aadhaar-mr.html या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
 •  वेबसाईटच्या मुखपृष्टावरच तुम्हाला आधार अपडेटचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 •  त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो पुढील रकान्यात भरा.
 • यानंतर Documents Update हा पर्याय निवडावा लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईट बिल यापैकी कोणतेही दोन कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत.
 • असे कागदपत्रं अपडेट करा ज्यावर तुमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक असेल.
 • यानंतर आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर अपडेट 14 अंकी रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल.
 • याद्वारे तुम्ही आधार अपडेटच्या प्रक्रियेचा स्टेटस जाणून घेऊ शकता.

भारतातील प्रत्येक नागरिकाने लवकरात लवकर त्यांचे आधारकार्ड अपडेट करावे नाहीतर 14 जूनच्या नंतर तुम्हाला याच प्रक्रियेला 10,000 रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे त्वरा करा आणि आजच्या आजच तुमचे आधारकार्ड अपडेट करुन घ्या. Update your Aadhaar before 14 June