Vihir Bandhkam Anudan Yojana: विहीर बांधकाम करण्यासाठी सरकार देतं आहे 100% अनुदान, असा करा अर्ज

Vihir Bandhkam Anudan Yojana : केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी विहीर बांधकाम करण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे.

विहीर बांधायची असेल तर तुम्हाला सरकारी अनुदान मिळत आहे. अनेकवेळा असं होतं की, अतिवृष्टी किंवा जास्त पावसामुळे पाण्यासोबत गाळाचे दगड विहिरीत जात असतात. यामुळे विहिरी मध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊन जाते. तसेच यामुळे विहीर कामीचे देखील राहणार नाही. अशावेळी विहिरीचे बांधकाम केलेले असणं आवश्यक आहे. (vihir anudan yojana)

पण वाढत्या महागाईमुळे लोखंड, सिमेंट, खडी, वाळू तसेच मजुरांची मजुरी देणं शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतकऱ्यांची इच्छा असूनही सुद्धा विहिरीचे बांधकाम करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र तुम्हाला विहिरीचे बांधकाम करण्यासाठी आता सरकार अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या विहिरीचे बांधकाम पूर्ण करू शकता.

विहीर बांधकाम अनुदान योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे. कारण की जसे विहीर खोदकाम करण्यासाठी अनुदान मिळत आहे, तसेच आता तुम्हाला विहीर बांधकाम करण्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

vihir bandhkam anudan yojana maharashtra विहीर बांधकाम अनुदान योजना
विहीर बांधकाम अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.20 आणि जास्तीत जास्त 5 हेक्टर पर्यंत जमीन असणं आवश्यक आहे. या योजनेमुळे तुमच्या विहिरीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. तुम्हाला विहीर खोदकाम करिता देखील अनुदान मिळते तसेच त्या प्रमाणे विहीर बांधकाम करण्यासाठी देखील अनुदान सरकार देत आहे.

म्हणजेच आता या योजनेमुळे विहिरीचे संपूर्ण काम मोफत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप प्रोसेस खाली देण्यात आली आहे. ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही सहज पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता

विहीर बांधकाम अनुदान योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
विहीर बांधकाम अनुदान योजने करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर गुगलवर जाऊन “Maha DBT Kisan Login” असा सर्च करा.
येथे Applicant Login ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
एकदा तुम्ही हे केल्यावर महाडीबीटी किसान वेबसाइटचे होम पेज ओपन होईल.
तुम्हाला येथे युजर आयडी आणि कॅप्चा कोड टाकून लॉगीन करायचे आहे. तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा नाव नोंदणी करू शकता.
लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
आता तुम्हाला दिसत असलेल्या विविध पर्यायांमधून अनुसूचित जाती आणि जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
या पर्यायासमोर दिसणाऱ्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
या टप्प्यावर एक नोट दिसेल, ती वाचा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना विविध समस्यांसाठी विशेष योजना आणि घटकांतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाईल. तुमच्या आवडीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडा, त्या संबंधित योग्य माहिती प्रदान करा आणि शेवटी तुमच्या सर्व
निवडलेल्या बाबी अर्जात जोडा.
ही सूचना पूर्ण होताच अर्ज उघडला जाईल. अर्जामध्ये अधिक माहिती आधीच प्रदान केली जाईल. नंतर तुम्हाला बाब या बॉक्स वर टिक करायचं आहे. एकदा तुम्ही या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर, या टप्प्यावर विविध योजनांची यादी दिसेल. त्यामधून तुम्ही vihir bandhkam anudan yojana या पर्यायावर क्लिक करा.

vihir anudan yojana maharashtra 2024 विहीर बांधकाम अनुदान योजनेची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेतली आहे. ही माहिती तुम्हाला समजली अशी आशा करतो. तसेच शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती व्हावे यासाठी आपण देखील ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करावी.