Vishwakarma Shram Samman Yojana: 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात असे म्हटले की, 07 सप्टेंबर 2023 पासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशात विश्वकर्मा कौशल सम्मान योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील लहान कामगार आणि कारागिरांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाणार असून, त्याअंतर्गत त्यांना अनुदानित कर्ज, व्यवसाय प्रशिक्षण, प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्यांची माहितीही देण्यात येणार आहे. या योजनेच्या मदतीने लहान असंघटीत कामगार, कुशल कारागीर, पारंपरिक व्यव्यावसायिक, शेती करणाऱ्यांना एमएसएमईशी (MSME) जोडण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023 संदर्भात माहिती
Vishwakarma Shram Samman Yojana या योजनेंतर्गत देशातील 18 प्रकारच्या पारंपारिक कारागीर आणि अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत कारागीर जसे सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर इत्यादींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनतर्फे 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येईल. या योजनेचा खर्च केंद्र शासनाच्या निर्णयानुसार केंद्र किंवा राज्य शासन करणार आहे. या योजने अंतर्गत देशातील 30 लाखांहून अधिक कारागिरांना लाभ मिळणार आहे.
अशा प्रकारे तुम्हाला आर्थिक मदत मिळेल
- विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल
- या कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 5 टक्के व्याजदर असेल.
- त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळणार आहे.
- विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही दिले जाणार आहे.
- आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत.
- विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेंतर्गत मजुरांना दिलेला निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.
- त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023 अधिकृत वेबसाईट
केंद्र सरकारतर्फे या योजनेचा संपूर्ण आराखडा कोणत्याही वेबसाइटवर जाहीर केलेल्या नसून सध्या ही योजना राज्य शासनतर्फे उत्तर प्रदेश राज्यात सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी http://diupmsme.upsdc.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.
कोण असतील विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेचे लाभार्थी?
- पारंपारिक कारागिर
- अल्प उत्पन्न श्रेणीतील कारागीर
- हस्तकला कामगार
- ओबीसी श्रेणीतील कारागीर
- अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत कारागीर जसे सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर
Vishwakarma Shram Samman Yojana 2023 चे उद्दिष्ट
- देशातील पारंपारिक कारागीर आणि अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत कारागीर जसे सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर इत्यादींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनतर्फे 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येईल.
- पारंपरिक कारागीर आणि लहान उत्पन्न श्रेणीतील कारागिरांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी 6 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल.
- पारंपारिक व्यावसायिक आणि हस्तकलेला प्रोत्साहन देणे आणि प्रगती करणे.
- या योजनेमुळे असंघटीत लहान कारागीर त्यांचे जीवनमान सुधारू शकतील.
- आर्थिक दृष्ट्या कमकुवत कारागिरांना रोजगार देणे आणि दारडोई उत्पन्नात वाढ करणे सोपे होईल.
- ओबीसी आणि मागासवर्गीय कारागिरांसाठी रोजगार निर्मिती करणे.
- या योजनेच्या मदतीने लहान असंघटीत कामगार, कुशल कारागीर, पारंपरिक व्यव्यावसायिक, शेती करणाऱ्यांना एमएसएमईशी जोडण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल.