Voter ID Card Online Download: भारत हा 130 कोटी जनतेचा देश आहे. येथे मतदानाचा हक्क महत्त्वाचा समजला जातो. कारण त्यानुसारच देशाते राजकारण आणि सरकार चालत असते. भारतात लोकशाही पद्धती असून. भारताने 1950 रोजी संविधानानुसार कामकाज करण्याचे स्वीकारले आहे. भारतीय संविधानानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक कागदपत्रं आहे, मतदान कार्ड हे भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना दिलेले फोटो ओळखपत्र असून त्याला मतदार ओळखपत्राला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड कार्ड Elector Photo identity card असेही म्हटले जाते.
e-EPIC वोटर कार्ड म्हणजे काय?
e-EPIC वोटर कार्ड म्हणजे मूळ मतदान ओळखपत्राचे एक नॉन एडिटेबल पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेट (पीडीएफ) व्हर्जन आहे. हे एक सुरक्षित डॉक्यूमेंट असून, यात कोणताही बदल करता येत नाही. Voter ID च्या पीडीएफ व्हर्जनाला तुम्ही ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरू शकता. तसेच हे मतदान कार्ड नागरिकांना कुठेही वापरता यावे म्हणून मोबाइल आणि Digi locker मध्ये देखील ते सेव्ह करुन ठेवू शकतो.
असे डाउनलोड करू शकताe-EPIC वोटर कार्ड
- यासाठी तुम्हाला http://voterportal.eci.gov.in/ किंवा https://nvsp.in/ या वेबसाइटवर जावे लागेल. यावर लॉग इन केल्यानंतर मेन्यू नेव्हिगेशनमध्ये Download e-EPIC हा पर्याय दिसतो.
- त्यानंतर Form6 वर जाऊन Apply online for registration of new voter ID वर क्लिक करा.
- New User वर क्लिक करून येथे तुमचे नाव, वय आणि लिंग इत्यादी माहिती नमूद करा.
- तुमचा आधार कार्डवरील पत्ता आणि इतर माहिती द्या.
- पुढे तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरिफाय करू शकतील.
- संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रं अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर तुमच्या फोन आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक अॅप्लिकेशन नंबर मिळेल.
- या नंबरचा वापर मतदान ओळखपत्राचे स्टेट्स चेक करण्यासाठी होईल.
- संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता.
e-EPIC म्हणजेच ई-मतदार कार्डचे फायदे
- मतदान कार्ड हे ओळखपत्र म्हणूनही काम करते.
- मतदान कार्ड 18 वर्षे वा 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक मतदार ओळखपत्र करिता अर्ज करू शकता.
- ई – मतदार कार्ड आपण कुठेही केव्हाही मोबाईलमध्ये दाखवू शकतो.
- डिजिटल पद्धतीने सध्या विविध योजनांसाठी ओळखपत्र अपलोड करावे लागते अशावेळी हे ई – मतदार कार्ड अपलोड करता येते.
- कुठेही प्रवास करताना लागल्यास आपण ते लगेच डाऊनलोड करुन समोरच्या व्यक्तीला आपली ओळख सिद्ध करु शकतो.
- तुमचे ओरिजनल मतदार कार्ड हरवले असल्यास तुम्ही तुमचे मतदार कर्ड ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करुन ओळखपत्र म्हणून वापरू शकता.
मतदार यादीत तुमचे नाव तपासा
भारतात दरवर्षी विविध राज्यांमध्ये विविध स्तरावरील निवडणूका होत असतात. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या पद्धतीच्या विविध स्तरावरील निवडणूकांसाठी निवडणूक आयोजामार्फत दिले जाणारे मतदार कार्ड अत्यंत महत्त्वाचे असते. कारण तेच कार्ड मतदाराची ओळख असते. या कार्डशिवाय मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. तुम्ही मतदार यादीत तुमचे नाव तपासले आहे का? नसेल तर आत्ताच तपासून घ्या!
- मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे https://Electoralsearch.in
- मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी स्वतःचे व वडिलांचे नाव टाकून आपले नाव तपासू शकता.
- दुसर्या टॅबमध्ये आपण आपले नाव e-EPIC च्या (मतदार ओळखपत्र) मगतीने म्हणजेच कार्डवरील संख्येनुसार पाहू शकता.
आपण आपल्या व्होटर अर्थात मतदान कार्डमध्ये नवीन माहिती अपडेट केली असेल तरच दुसरा टॅब वापरा. त्यानुसार आपल्याकडे एपिक नंबर नसल्यास ‘तपशीलांनुसार शोध घ्या’ वर क्लिक करा (How to check your name in voter list by these easy step).